Virat Kohli : हात मिळवणं तर लांबच, विराटने गंभीरसोबत काय केलं? इंदूरच्या मैदानातला शॉकिंग Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरमध्ये वनडे सीरिजची तिसरी मॅच झाली, या सामन्याआधी भारतीय टीमने इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये जोरदार सराव केला.
इंदूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंदूरमध्ये वनडे सीरिजची तिसरी मॅच झाली, या सामन्याआधी भारतीय टीमने इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये जोरदार सराव केला, पण प्रॅक्टिस सेशनदरम्यान असं दृश्य दिसलं ज्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसदरम्यान विराट कोहली आणि कोच गौतम गंभीर दिसत आहे. या व्हिडिओमध्ये विराट आणि गंभीर एकमेकांसोबत बोलतही नाहीयेत.
समोर गौतम गंभीर आल्यानंतर विराट कोहली त्याच्यापासून लांब झाला आणि त्याच्याकडे न पाहताच पुढे निघून गेला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यावर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. टीम इंडियामधलं वातावरण सध्या चांगलं नसल्याच्या कमेंटही चाहते करत आहेत.
Virat Kohli and Gautam Gambhir walked past each other but didn’t even look at one another - Is there really some issue going on between the two?
After India’s win in the 1st ODI against New Zealand, only Rohit Sharma hugged Gambhir — Virat did not. pic.twitter.com/9RmBbZcBH1
— Jara (@JARA_Memer) January 17, 2026
advertisement
'विराट-रोहित आणि गंभीरमध्ये वाद नाहीत'
टीम इंडियाचा बॅटिंग कोच सितांशू कोटक यांनी मात्र विराट आणि रोहित यांचे गौतम गंभीरसोबत कोणतेही वाद नाहीत. विराट-रोहित गौतम गंभीरसोबत बोलतात, असं स्पष्टीकरण दिलं आहे. 'बहुतेक वेळा मी तिथे असतो, त्यांच्यामध्ये नेहमी बातचित होते. सोशल मीडियावर अशा बऱ्याच गोष्टी येतात, पण मी त्या पाहत नाही. पण मी जवळून जे पाहत आहे, ते पाहून मला गोष्टी सकारात्मक दिसत आहेत', असं सितांशू कोटक म्हणाले आहेत.
advertisement
विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 नंतर टेस्ट क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली. विराट-रोहितच्या टेस्टमधल्या या निवृत्तीला कोच गौतम गंभीर जबाबदार असल्याची टीकाही चाहत्यांनी केली होती. विराट आणि रोहित 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? याबाबतचा सस्पेन्सही निर्माण झाला आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Indore,Madhya Pradesh
First Published :
Jan 18, 2026 6:05 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Virat Kohli : हात मिळवणं तर लांबच, विराटने गंभीरसोबत काय केलं? इंदूरच्या मैदानातला शॉकिंग Video









