मौनी अमावस्येच्या संध्याकाळी एकही चूक पडेल महागात, न विसरता करा 'हे' उपाय; झटक्यात चमकेल नशीब!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज पौष महिन्यातील अत्यंत महत्त्वाची 'मौनी अमावस्या' आहे. ज्योतिषशास्त्रात अमावस्येची संध्याकाळ ही आध्यात्मिक शक्ती जागृत करण्यासाठी आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. आजच्या दिवशी ग्रहांची स्थिती अशी आहे की, सूर्यास्तानंतर केलेले काही विशेष उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करू शकतात.
आज पौष महिन्यातील अत्यंत महत्त्वाची 'मौनी अमावस्या' आहे. ज्योतिषशास्त्रात अमावस्येची संध्याकाळ ही आध्यात्मिक शक्ती जागृत करण्यासाठी आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. आजच्या दिवशी ग्रहांची स्थिती अशी आहे की, सूर्यास्तानंतर केलेले काही विशेष उपाय तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करून प्रगतीचे मार्ग मोकळे करू शकतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे नशीब साथ देत नाहीये किंवा कामात वारंवार अडथळे येत आहेत, तर आज संध्याकाळी खालील उपाय नक्की करा.
advertisement
advertisement
advertisement
पितरांचे स्मरण करून प्रार्थना: अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित आहे. संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून पितरांचे ध्यान केल्यास त्यांचे विशेष आशीर्वाद लाभतात. घराच्या दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा एक चौमुखी दिवा लावा. यामुळे पितरांचा मार्ग उजळतो आणि ते प्रसन्न होऊन कुटुंबाला सुख-शांतीचा आशीर्वाद देतात.
advertisement
advertisement
advertisement
गरजूंना भोजन द्या: शास्त्रानुसार, अमावस्येला रिकाम्या पोटी असलेल्या व्यक्तीला अन्न देणे हे अश्वमेध यज्ञासारखे फळ देते. आज रात्रीच्या जेवणापूर्वी एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा गरिबाला पोटभर जेवण द्या. जर हे शक्य नसेल तर किमान धान्य किंवा फळांचे दान करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








