Mumbai Ahmedabad Expressway: गुजरात- मुंबई वाहतूक रोखली? नेमकं कारण काय
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
महाराष्ट्र सरकारने गुजरातवरून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुजरातवरून मुंबईमध्ये पालघर- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
मुंबई: महाराष्ट्र सरकारने गुजरातवरून मुंबईमध्ये येणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुजरातवरून मुंबईमध्ये पालघर- मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. दोन दिवसांसाठी महाराष्ट्र सरकारने अवजड वाहनांवर बंदी घातली असून सरकारने काही कारणास्तव हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून मोठा लाँग मार्च आयोजित केला गेला आहे. या दृष्टीनेच सरकारने खबरदारी म्हणून वाहनांवर बंदी घोषित केली आहे.
वाहनांना प्रवेश बंदीचं कारण
महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांसाठी गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना बंदी घालण्याचं मुख्य कारण म्हणजे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (MCP) आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एक मोठा लाँग मार्च निघणार आहे. या लाँग मार्चमुळे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणकोणत्या पर्यायी मार्गांचे वापर करण्याचे आवाहन केले, एक नजर टाकूया...
advertisement
अवजड वाहने चालवणाऱ्या वाहन चालकांनी पारंपारिक मार्गांचा वापर करू नयेत, असे प्रशासनाकडून मार्गदर्शन करण्यात आले आहे. कारण येत्या दोन दिवस रस्त्यांवर वाहनांसह मोर्चेकरांचीही मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. या दृष्टीनेच सरकारने निर्णय दिला आहे. हायवेवरील वाहतूक व्यवस्थित ठेवण्यासाठी पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवले जाणार आहे. वाहन चालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याची सूचना देण्यात आली असून प्रशासनाने लोकल मार्गांवर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (MCP) आणि किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकर्यांचा हा मोठा लाँग मार्च डहाणूच्या चारोटी येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकण्याचा अनुमान आहे.
advertisement
शेतकऱ्यांच्या सरकारकडे मागण्या काय?
शेतकऱ्यांच्या या मोर्चामध्ये, 50,000 पेक्षा अधिक मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती आहे. या मोर्चात शेतकऱ्यांची आणि आदिवासींची विविध प्रलंबित मागणी सादर केली जाणार आहे. वयोवृद्ध शेतकऱ्यांची कर्जमाफी, जलसिंचन योजना, शेतमालाच्या किंमतीत वाढ, आदिवासींच्या जमिनीचे संरक्षण आणि आदिवासींना सरकारी योजनांचे लाभ मिळावेत, अशा प्रमुख मागण्या शेतकरी सरकारकडे करत आहे. मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे बैलगाड्या आणि नांगर घेऊन शेतकरी मोर्चासाठी निघणार आहेत. होईल, ज्यामुळे हा मोर्चा ऐतिहासिक दृष्टिकोनाने एक महत्त्वाचे आंदोलन ठरू शकते. पालघर जिल्हा प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 18, 2026 5:27 PM IST








