VIDEO : गंभीर विरोधात जोरदार घोषणाबाजी, चाहत्यांना कुणीच अडवलं नाही, शेवटी एकटाच पुढे आला,कोचची बाजू घेणारा 'तो' कोण?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताच्या या पराभवानंतर गौतम गंभीरला चाहत्यांनी टार्गेट केलं होतं. या संदर्भातला व्हिडीओ देखील समोर आला होता.
India vs News Zealand : उद्यापासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला सूरूवात होणार आहे. या मालिकेआधी टीम इंडियाने इंदूरमध्ये शेवटचा वनडे सामना गमावला होता. त्यामुळे न्यूझीलंडने 37 वर्षानंतर पहिल्यांदाच वनडे मालिका गमावली होती. भारताच्या या पराभवानंतर गौतम गंभीरला चाहत्यांनी टार्गेट केलं होतं. या संदर्भातला व्हिडीओ देखील समोर आला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये सामन्यानंतर गौतम गंभीर, केएल राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा असे सगळेच खेळाडू उभे आहेत. या दरम्यान स्टेडिअममधून काही फॅन्स गौतम गंभीर 'हाय हाय'चे नारे देतात. हे नारे पाहून सगळेच मागे वळून पाहतात. त्यानंतर सगळे पुन्हा चाहत्यांना दुर्लक्षित करतात.
“Gautam Gambhir haye haye” chants were heard during yesterday after the match .Players looked visibly uncomfortable—reaction worth noticing.
Is Gautam Gambhir Actually Ruining the team , or are fans overreacting emotionally?
Honest answers only 🔥pic.twitter.com/L2q5tNZix2
— SixrXI (@SixrXIH) January 20, 2026
advertisement
विशेष म्हणजे यानंतर विराट कोहलीने हातवारे करून चाहत्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे जिकडे गंभीर विरोधात घोषणाबाजी सूरू होती तिकडे कुणीच चाहत्यांना शांत करायचा प्रयत्न केला नाही, त्यानंतर विराट कोहलीने धाडस दाखवून चाहत्यांना घरं केलं होतं. या संदर्भाला व्हिडिओ देखील समोर आली आहे.
दरम्यान हा व्हिडिओ फेक असल्याच देखील बोललं जात आहे. कारण मागच्या वेळेस देखील अशाचप्रकारे गौतम गंभीर विरोधात मैदानात घोषणाबाजी झाली होती.असे बोलले जात आहे की,मागच्या व्हिडिओतला वॉईस ओव्हर या व्हिडिओला लावून हा व्हिडिओ शेअर केल्याचे बोलले जात आहे.
advertisement
भारत विरूद्ध न्यूझीलंड टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20 सामना : 21 जानेवारी 2026, नागपूर संध्याकाळी 7.00 वाजता
दुसरा टी20 सामना : 23 जानेवारी 2026, रायपूर संध्याकाळी 7.00 वाजता
तिसरा टी20 सामना : 25 जानेवारी 2026, गुवाहाटी, संध्याकाळी 7.00 वाजता
चौथा टी20 सामना : 28 जानेवारी 2026, विशाखापट्टणम,संध्याकाळी 7.00 वाजता
पाचवा टी20 सामना : 31 जानेवारी 2026, तिरूवनंतपुरम, संध्याकाळी 7.00 वाजता
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 8:25 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : गंभीर विरोधात जोरदार घोषणाबाजी, चाहत्यांना कुणीच अडवलं नाही, शेवटी एकटाच पुढे आला,कोचची बाजू घेणारा 'तो' कोण?










