IND vs PAK Final : पाकिस्तानविरुद्धच्या फायनलआधी सूर्याला डोकेदुखी, गंभीरचा बीपी वाढला; आकडे पाहून बसेल तुम्हाला भरेल धडकी!

Last Updated:

IND vs PAK head to head In finals : फायनल मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आकडेवारी भारतासाठी चिंता वाढवणारी आहे. यापूर्वी झालेल्या 12 फायनल मॅचमध्ये पाकिस्तानचा वरचष्मा आहे.

IND vs PAK head to head In finals
IND vs PAK head to head In finals
IND vs PAK, Asia Cup Final : क्रिकेट जगतातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित मॅच आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना भिडणार आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानला या स्पर्धेत दोनवेळा पराभव केला आहे. अशातच आता आशिया कपच्या 41 वर्षाच्या इतिहासातील फायनलमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच आमने सामने येणार आहेत. अशातच आता मागील काही आकडेवारी काढली तर टीम इंडियाला मोठा धक्का बसू शकतो.

पाकिस्तानने तब्बल 8 वेळा बाजी मारली

कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत किंवा ट्रँग्युलर सीरीजच्या फायनलमध्ये हे दोन्ही संघ 12 व्या वेळेस एकमेकांसमोर उभे ठाकले होते. फायनल मॅचमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आकडेवारी भारतासाठी चिंता वाढवणारी आहे. यापूर्वी झालेल्या 12 फायनल मॅचमध्ये पाकिस्तानने तब्बल 8 वेळा बाजी मारली आहे, तर भारताला केवळ 4 वेळाच विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आता टीम इंडिया हा रेकॉर्ड सुधारणार का? असा सवाल विचारला जातोय.
advertisement

18 वर्षांचा रेकॉर्ड टीम इंडिया मोडणार? 

भारताने पाकिस्तानविरुद्धचा आपला शेवटचा खिताबी विजय 2007 च्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपामध्ये मिळवला होता. त्या ऐतिहासिक मॅचमध्ये भारताने थरारक विजय मिळवून पहिला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता. या 2007 नंतर, दोन्ही संघ शेवटच्या वेळेस 2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलसाठी आमनेसामने आले होते. मात्र, त्यावेळीही पाकिस्ताननेच मॅच जिंकून भारताला पराभवाचा धक्का दिला होता.
advertisement

दुष्काळ संपवण्याची सुवर्णसंधी

आजचा सामना भारतीय संघासाठी केवळ एक मॅच नाही, तर 8-4 असा असलेला हा पराभवाचा इतिहास बदलण्याची आणि 2007 नंतर पाकिस्तानविरुद्धचा फायनलमधील विजयाचा दुष्काळ संपवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK Final : पाकिस्तानविरुद्धच्या फायनलआधी सूर्याला डोकेदुखी, गंभीरचा बीपी वाढला; आकडे पाहून बसेल तुम्हाला भरेल धडकी!
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement