VIDEO : भारत-पाक सामन्यात तुफान राडा, भारतीय खेळाडूसोबत पाकिस्तानचं चीड आणणार कृत्य
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारत आणि पाकिस्तान सामन्यात मोठा राडा झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज भारतीय खेळाडूसोबत विचित्र लागला आहे. या संदर्भातले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान सामन्यात मोठा राडा झाला आहे. या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज भारतीय खेळाडूसोबत विचित्र लागला आहे. या संदर्भातले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूच्या या वागण्याची भारतीय चाहत्यांना चीड आली आहे.
advertisement
खरं तर एसीसी मेन्श आशिया कप रायसिंग स्टार 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. या सामन्यात पाकिस्ताने टॉसने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजी दरम्यान मोठा राडा झाला आहे. त्याचं झालं असं की भारताचा नमन धीर उत्कृष्ट फलंदाजी करत होता.त्याने साधारण 20 बॉलमध्ये 35 धावांची खेळी केली होती. या दरम्यान पाकिस्तानला नमन धीरची विकेट काढण्यात अपयश येत होते.त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू प्रचंड चिडले होते.
advertisement
Saad Masood with a wicket 👏🏽 #PAKvIND
pic.twitter.com/G3Qh0RhTRp
— Usman (@jamilmusman_) November 16, 2025
दरम्यान पाकिस्तानकडून 9 वी ओव्हर टाकायला साद मसूद आला होता. यावेळी त्याने त्याच्या तिसऱ्याच बॉलवर उत्कृष्ट खेळी करणाऱ्या नमन धीरला बाद केले होते. या विकेटनंतर शान मसूदने नमन धीरला हातवारे करत मैदानाबाहेर करण्याचा इशारा दिला होता. यावर नमन धीरने त्याला काहीच रिप्लाय दिला नाही. पण या घटनेने मैदानात मोठा राडा झाला होता.या राड्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
advertisement
पाकिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद नईम, माझ सदाकत, यासिर खान, मोहम्मद फैक, इरफान खान (कर्णधार), साद मसूद, गाझी घोरी (उप कर्णधार), शाहिद अजीज, उबेद शाह, अहमद दानियाल, सुफियान मुकीम
advertisement
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 9:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : भारत-पाक सामन्यात तुफान राडा, भारतीय खेळाडूसोबत पाकिस्तानचं चीड आणणार कृत्य


