IND vs PAK : भारत 91 वर 3 होता, पुढे 136 वर कसा ALL OUT झाला? पाकिस्तानसमोर सपशेल शरणागती
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भारताने 9 ओव्हरमध्ये पाकिस्तानला 91 धावा चोपल्या होत्या. पण नंतर असं काय झालं की भारत 136 धावातच ऑल आऊट झाला. त्यामुळे सामन्यात नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊयात.
India vs Pakistan : एसीसी मेन्स रायझिंग स्टार आशिया कप 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक सामना सूरू आहेत. या सामन्यात सूरूवातीला भारताचे सामन्यावर मजबूत पकड होती.त्यावेळी भारताने 9 ओव्हरमध्ये पाकिस्तानला 91 धावा चोपल्या होत्या. पण नंतर असं काय झालं की भारत 136 धावातच ऑल आऊट झाला. त्यामुळे सामन्यात नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊयात.
advertisement
पाकिस्तानने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.त्यामुळे टीम इंडिया प्रथम फलंदाजीला उतरली होती. यावेळी भारताकडून वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्याने डावाची सूरूवात चांगली केली होती. वैभव सूर्यवंशीने तर पहिल्या बॉलपासून प्रहार करायला सूरूवात केली होती. पण त्याचा साथिदार प्रियांश आर्या 10 धावांवर बाद झाला.त्याच्यानंतर मैदानात आलेल्या नमन धीरने ताबडतोड फलंदाजी केली. या दरम्यान तो 35 धावांवर बाद झाला.
advertisement
त्याच्यानंतर वैभव मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती पण तो देखील 28 बॉलमध्ये 45 धावा करून बाद झाला. वैभव ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस भारत 9 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 91 वर खेळत होते. मात्र त्यानंतर भारताचा डाव गडगडला. आणि फक्त 45 धावात 7 विकेट गमावल्या. अशाप्रकारे भारताचा डाव 19 ओव्हरमध्ये 136 धावांवर ऑल आऊट झाला होता.
advertisement
पाकिस्तानकडून शाहिद अजिजने 3, साद मसूदने आणि माज सदाकतने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. उबेद शाह, अहमद दनियाल आणि सुफियान मुकीमने प्रत्येकी 1 विकेट काढली होती. आता पाकिस्तानसमोर 137 धावांचे आव्हान होते.आता पाकिस्तान या धावा पूर्ण करून सामना जिंकते की भारत त्यांचा पराभव करतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
पाकिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद नईम, माझ सदाकत, यासिर खान, मोहम्मद फैक, इरफान खान (कर्णधार), साद मसूद, गाझी घोरी (उप कर्णधार), शाहिद अजीज, उबेद शाह, अहमद दानियाल, सुफियान मुकीम
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 10:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : भारत 91 वर 3 होता, पुढे 136 वर कसा ALL OUT झाला? पाकिस्तानसमोर सपशेल शरणागती


