मतदारांवर बोलले प्रफुल्ल पटेल, सांगा बरं कसं 'पटेल'? महायुतीतल्या कोणत्या पक्षावर रोख?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Praful Patel: कोणी स्वतःला बाहुबली समजू नका, अनेकांना आम्ही निवडून आणलंय, महायुतीत असलो तरी राष्ट्रवादीची वेगळी ओळख आहे, असे प्रफुल पटेल म्हणाले. त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, याची चर्चा आहे.
संतोष गोरे, प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय. लोक पैसे घेऊन दुसऱ्यालाच मत देतात, असं वक्तव्य पटेलांनी केलंय. पटेलांचं वक्तव्य लोकशाहीला हानिकारक असल्याचं मत सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलंय. प्रफुल्ल पटेल्यांनी भंडाऱ्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना सहकारी पक्षांवरही तोफ डागली.
राष्ट्रवादी काँग्रसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कुणीही स्वत:ला बाहुबली समजू नका, असा नाव न घेता इशारा महायुतीतील सहकारी सत्ताधाऱ्यांना दिला. तर मतदारांवरही पटेलांनी मुक्ताफळं उधळली. निवडणुकीत जितकी गरजेची आहे, तितका पैसा खर्च करावाच लागतो, अशी बहुमूल्य माहितीही प्रफुल्ल पटेलांनी दिलं. तसेच लोक पैसे घेऊन दुसऱ्याला मतदान करतात, असेही ते म्हणाले.
advertisement
प्रफुल पटेल यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची टीका
प्रफुल्ल पटेल यांच्या या वक्तव्याच्या सुप्रिया सुळेंनी समाचार घेतला. मतदारांची खिल्ली उडवण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. सुप्रिया सुळेंनी प्रफुल्ल पटेलांवर तोफ डागली. मात्र प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यात त्यांच्या मित्रपक्षांनाही चांगलंच सुनावलं. स्वत:ला बाहुबली समजणाऱ्यांना आम्ही निवडून दिलंय, याची आठवणी पटेल यांनी महायुतीतील मित्रपक्षांना करून दिली.
advertisement
प्रफुल पटेल यांचा रोख कोणत्या पक्षाकडे, मुख्यमंत्री म्हणाले...
प्रफुल्ल पटेल यांनी बाहुबली शब्द तर वापरला, मात्र कुणाचंही नाव घेतलं नाही. पण त्यांचा इशारा महायुतीतील मित्रांवरच असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे पत्रकारांनी या मुद्यावरून थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला. मुख्यमंत्र्यांनी प्रफुल्ल पटेलांचा रोख कुणाकडे आहे, हे शोधण्याचं काम माध्यमांकडे देऊन टाकलं. त्यामुळे आता माध्यमांच्या शोधात कोणती नावं समोर येतात, हे आता लवकरच स्पष्ट होईल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 10:02 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मतदारांवर बोलले प्रफुल्ल पटेल, सांगा बरं कसं 'पटेल'? महायुतीतल्या कोणत्या पक्षावर रोख?


