Vaibhav Suryavanshi : 6,6,6,4,4,4...वैभव सुर्यवंशीने धू धू धुतलं, पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली, VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात वैभव सुर्यवंशीने 3 गगनचुंबी षटकार आणि पाच खणखणीत चौकार लगावले होते.त्यामुळे वैभव सूर्यवंशीच्या या खेळीची प्रचंड चर्चा रंगली आहे.
India vs Pakistan : टीम इंडियाच्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानला घाम फोडला आहे. कारण आज पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात वैभव सुर्यवंशीने 3 गगनचुंबी षटकार आणि पाच खणखणीत चौकार लगावले होते.त्यामुळे वैभव सूर्यवंशीच्या या खेळीची प्रचंड चर्चा रंगली आहे. वैभवच्या या खेळीचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
खरं तर एसीसी मेन्श आशिया कप रायसिंग स्टार 2025 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले आहेत. या सामन्यात पाकिस्ताने टॉसने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तान विरूद्ध खेळताना वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे.वैभव सूर्यवंशीने 27 बॉलमध्ये 45 धावांची खेळी केली आहे.या खेळी दरम्यान त्याने 3 गगनचुंबी षटकार आणि पाच खणखणीत चौकार लगावले आहेत. या खेळी दरम्यान वैभवचा स्ट्राईक रेट 160 च्या आसपास होता.
advertisement
WHAT A SHOT FROM VAIBHAV SURYAVANSHI. pic.twitter.com/gVEiURim2y
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 16, 2025
पाकिस्तान अ (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद नईम, माझ सदाकत, यासिर खान, मोहम्मद फैक, इरफान खान (कर्णधार), साद मसूद, गाझी घोरी (उप कर्णधार), शाहिद अजीज, उबेद शाह, अहमद दानियाल, सुफियान मुकीम
advertisement
भारत अ (प्लेइंग इलेव्हन): वैभव सूर्यवंशी, प्रियांश आर्य, नेहल वढेरा, नमन धीर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकिपर), रमणदीप सिंग, आशुतोष शर्मा, हर्ष दुबे, यश ठाकूर, गुरजपनीत सिंग, सुयश शर्मा
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 9:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi : 6,6,6,4,4,4...वैभव सुर्यवंशीने धू धू धुतलं, पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढली, VIDEO


