Indurikar Maharaj: बायकोसोबतच्या संबंधाची तारीख ते लेकीबाळींवर खालच्या शब्दात टीका, इंदुरीकरांची 4 वादग्रस्त वक्तव्ये

Last Updated:

इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीमधल्या अंतरामुळे लोकांनी सोशल मीडियावर त्यांची चांगलीचं शाळा घेतलीय.

News18
News18
मुंबई : आपल्या किर्तनातून सगळ्यांचीच बिन पाण्यानं चंप्पी करणाऱ्या इंदुरीकरांची सध्या लोकांकडून जोरदार चंपी सुरु आहे. मुलीच्या शाही साखरपुडा त्याचं कारण आहे. २१ वर्ष किर्तनातून साधेपणाचा उपदेश करणाऱ्या इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीत फरक दिसला, म्हणून लोक चिडलेत. त्यामुळे इंदुरीकर महाराज सध्या ट्रोलिंगनं बेजार आहेत. इतके की त्यांनी कार्तनकाराचा फेटाच खाली ठेवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, मुलीचं लग्नही धुमधडाक्यात करणार असल्याचा नवा पवित्रा इंदुरीकर महाराजांनी घेतलाय.
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील लोकप्रिय किर्तनकार, प्रबोधनकार इंदूरीकर किर्तनाला कायमचा निरोप देत फेटा खाली ठेवण्याच्या मानसिकतेत पोहोचलेत. मुलीच्या साखरपुड्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना ट्रोल केलं जात असल्यानं इंदुरीकर व्यथीत झालेत.

सोशल मीडियावर त्यांची चांगलीचं शाळा घेतली

इंदुरीकरांच्या मुलीचा नुकताच राजेशाही साखरपुडा संपन्न झाला. त्यानंतर त्यांना त्यांच्या किर्तनातील उपदेशाची आठवण करून देत तुफान ट्रोल केलं जातंय. जिथं इंदुरीकर त्यांच्या स्टाईलमध्ये लोकांना सागत होते की लग्न साधे केले तरी पोरं होतात. इंदुरीकरांच्या कथनी आणि करणीमधल्या अंतरामुळे लोकांनी सोशल मीडियावर त्यांची चांगलीचं शाळा घेतलीय.
advertisement

किर्तनात विनोदी शैलीत कुप्रथांबद्दल भाष्य

इंदुरीकर महाराज आपल्या किर्तनात विनोदी शैलीत कुप्रथांबद्दल भाष्य करतात. पण त्याचवेळी त्यांच्या महिलांबद्दलच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांना टीकेचं धनी व्हावं लागलं होतं. त्यामुळे इंदुरीकर पहिल्यांदाच वादात सापडले असं नाही. त्यांच्या किर्तनाच्या स्टाईलवरून, किर्तनातल्या शब्दांवरून अनेक वाद निर्माण झाले. अगदी त्यांना कोर्टाची पायरीही चढावी लागेली होती.
advertisement

इंदुरीकर महाराज आणि आतापर्यंत झालेले वाद

  • 2019 मध्ये शिक्षकांबद्दल भावना दुखावणारं वक्तव्य केल्यानं शिक्षक संघटना नाराज झाल्या.
2020 ला किर्तनात सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, विषम तिथीला मुलगी होते. अशुभ वेळी झाल्यास संतती रांगडी-बेवडी होते असं वक्तव्य केलं. PCPNDT कायद्याचे उल्लंघन आणि अंधश्रद्धा पसरविण्याचा आरोप आरोग्य विभागानं नोटीस पाठवली, इंदुरीकरांनी प्राचीन ग्रंथांवर आधारित असल्याचं सांगितलं
advertisement
  • 2022 मध्ये किर्तनात माळा काढणाऱ्यांनीच कोरोनाची तिसरी लाट आणल्याचा दावा केला.
  • माझे व्हिडिओ अपलोड करून पैसे कमावणाऱ्यांची मुले दिव्यांग जन्माला येतील असं म्हणत अभिशाप दिला.
  • साध्या लग्नाचा उपदेश देणाऱ्यांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केल्यामुळे टीका केली. किर्तन परंपरा ही वारकरी संप्रदायातील प्रबोधनाचं सर्वात प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे फेटा बांधून गादीवरून उच्चारलेल्या शब्दाला कृतीची जोड नसेल आणि शब्द परंपरेला शोभणारे नसतील तर टीका होणं स्वाभाविक आहे. इंदुरीकरांच्या मुलीवर टीका करणाऱ्यावर कायद्यानं कारवाई व्हावी पण इंदुरीकरांची भाषाही स्टँडअप कॉमेडीसारखी नाही तर वारकरी परंपरेला साजेशी असावी ही अपेक्षा आहे.
    view comments
    मराठी बातम्या/महाराष्ट्र/
    Indurikar Maharaj: बायकोसोबतच्या संबंधाची तारीख ते लेकीबाळींवर खालच्या शब्दात टीका, इंदुरीकरांची 4 वादग्रस्त वक्तव्ये
    Next Article
    advertisement
    Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
    परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
      View All
      advertisement