थर्ड अंपायरने आऊट दिलं, तरी कचाकचा भांडली पाकिस्तानी खेळाडू, IND vs PAK मेन्सपेक्षा वूमन क्रिकेटमध्ये ड्रामा, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
IND vs PAK भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या महिला वर्ल्ड कपच्या सामन्यात मोठा राडा झाला आहे. भारताने दिलेलं 248 रनचं आव्हान पार करायला आलेल्या पाकिस्तानने इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्येच रडीचा डाव खेळला.
कोलंबो : भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या महिला वर्ल्ड कपच्या सामन्यात मोठा राडा झाला आहे. भारताने दिलेलं 248 रनचं आव्हान पार करायला आलेल्या पाकिस्तानने इनिंगच्या चौथ्या ओव्हरमध्येच रडीचा डाव खेळला. क्रांती गौडच्या बॉलिंगवर मुनीबा अलीच्या पॅडला बॉल लागला, यानंतर भारतीय टीमने एलबीडब्ल्यूसाठी अपील केलं, पण अंपायरने मुनीबा अलीला आऊट दिलं नाही.
भारतीय खेळाडू अपील करत असताना मुनीबा अंपायरच्या निर्णयाकडे बघत होती, पण आपला पाय आणि बॅट क्रीजच्या बाहेर आहे, हे तिच्या लक्षातच आलं नाही. मुनीबा क्रीजबाहेर असल्याचं दीप्ती शर्माच्या लक्षात आलं आणि तिने स्टम्पच्या दिशेने बॉल फेकला. दीप्तीने फेकलेला थ्रो थेट स्टम्पवर जाऊन आदळला आणि त्यानंतर भारतीय महिला टीमने अपील केलं.
advertisement
टीम इंडियाच्या खेळाडूंनी अपील केल्यानंतर अंपयारने थर्ड अंपायरचा इशारा केला. थर्ड अंपायरने जेव्हा रिप्ले पाहिले तेव्हा मुनीबाचा पाय क्रीजबाहेर होता आणि बॅटही हवेत होती, त्यामुळे तिला रन आऊट देण्यात आलं. थर्ड अंपयारने रन आऊट दिल्यानंतरही मुनीबा मैदानातच थांबून आपण आऊट नसल्याचा दावा करायला लागली. यानंतर फोर्थ अंपायरही मैदानात आला आणि त्याने मुनीबाला समजावलं. मैदानात झालेल्या या ड्राम्यानंतर अखेर मुनीबा पॅव्हेलियनमध्ये गेली, पण या संपूर्ण वादात बराच वेळ फुकट गेला.
advertisement
@cricketaakash - The wicket is about to come,
After that a wicket came in the next over.
What a prediction sir, I really salute you.
Kranti Gaud to Muneeba Ali, THATS OUT!! Run Out!!#INDWvPAKW #ICCWomensWorldCup2025 pic.twitter.com/YPvzAS0KL1
— Asia Voice 🎤 (@Asianewss) October 5, 2025
advertisement
सूर्यानेही केला असाच रन आऊट
याआधी आशिया कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही दीप्ती शर्मासारखाच रन आऊट केला होता. 21 सप्टेंबरला झालेल्या सुपर-4 च्या सामन्यात सूर्यकुमार यादवने मोहम्मद नवाजला रन आऊट केलं होतं. नवाज क्रीजच्या बाहेर उभा आहे आणि त्याची बॅट हवेत आहे, हे लक्षात येताच सूर्याने स्टम्पवर डायरेक्ट हिट केलं, ज्यामुळे नवाजला रन आऊट देण्यात आलं.
advertisement
पाकिस्तानला 248 रनचं आव्हान
महिला वर्ल्ड कपच्या या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला विजयासाठी 248 रनचं आव्हान दिलं आहे. 50 ओव्हरमध्ये टीम इंडियाचा 247 रनवर ऑल आऊट झाला. तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या हरलीन देओलने 65 बॉलमध्ये सर्वाधिक 46 रन केले. याशिवाय जेमिमा रोड्रिग्जने 32 तर प्रतिका रावलने 31 रनची खेळी केली. या सामन्यात टीम इंडियाच्या टॉप-8 पैकी कर्णधार हरमनप्रीत कौर (19 रन) वगळता प्रत्येक खेळाडूने 20 पेक्षा जास्त रन केले, पण एकालाही अर्धशतक करता आलं नाही.
advertisement
भारतीय महिला टीम आणि पाकिस्तानी महिला टीममध्ये आतापर्यंत 11 वनडे सामने झाले आहेत, या सगळ्या सामन्यांमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. तर भारत-पाकिस्तान महिला टीम वनडे वर्ल्ड कपमध्ये 4 वेळा समोरासमोर आल्या, यातल्या सर्व 4 सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे. भारताविरुद्ध पाकिस्तानच्या महिला टीमला एकदाही 200 रनचा टप्पा पार करता आलेला नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 05, 2025 8:34 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
थर्ड अंपायरने आऊट दिलं, तरी कचाकचा भांडली पाकिस्तानी खेळाडू, IND vs PAK मेन्सपेक्षा वूमन क्रिकेटमध्ये ड्रामा, Video