Rohit Sharma : विराटच्या शतकानंतर रोहितचं ऍन्ग्री सेलिब्रेशन, हिटमॅनने कोणते शब्द वापरले? अर्शदीपने थेट सांगितलं, Video
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये विराट कोहलीने शतक केलं, या शतकानंतर रोहित शर्माने नेमके कोणते शब्द वापरले? याचं उत्तर अर्शदीप सिंगने दिलं आहे.
रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये टीम इंडियाचा 17 रननी विजय झाला. भारताने दिलेलं 350 रनचं आव्हान पार करताना दक्षिण आफ्रिकेचा 332 रनवर ऑलआऊट झाला. विराट कोहलीचं शतक तसंच रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अर्धशतकामुळे भारताने 50 ओव्हरमध्ये 349 रनपर्यंत मजल मारली. विराट कोहलीने 120 बॉलमध्ये 135 रन केले, ज्यामध्ये 11 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. तर केएल राहुलने 60 आणि रोहित शर्माने 57 रन केले.
विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे 52 वं शतक होतं. विराटच्या या शतकानंतर ड्रेसिंग रूममधले सगळे सहकारी उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. विराटच्या शतकानंतर रोहित शर्माने केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विराटच्या शतकाचं सेलिब्रेशन करताना रोहितने अपशब्द वापरल्याचा दावा चाहते करत आहेत. या सगळ्या चर्चांवर आता टीम इंडियाचा फास्ट बॉलर अर्शदीप सिंगने प्रतिक्रिया दिली आहे.
advertisement
advertisement
विराटच्या शतकानंतर रोहित काय म्हणाला? असे बरेच मेसेज येत आहेत. रोहित काय म्हणाला ते मी सांगतो. 'निली परी, लाल परी कमरेमे बंद, मुझे नादिया पसंत', असं रोहित म्हणाल्याचं अर्शदीपने सांगितलं, यानंतर अर्शदीप जोरजोरात हसायला लागला.
Arshdeep Singh is telling what Rohit Sharma said after Virat Kohli’s century. pic.twitter.com/1riSklcoT4
— (@rushiii_12) December 1, 2025
advertisement
विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला होता, पण दोघांनीही त्यांच्या बॅटनेच हे प्रश्न विचारणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. पहिल्या वनडेमध्ये शतक झळकावल्यानंतर विराट कोहलीला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मॅचनंतर विराटला टेस्ट क्रिकेटमधली रिटायरमेंट मागे घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, ज्याला विराटने स्पष्टपणे नकार दिला आहे.
view commentsLocation :
Ranchi,Jharkhand
First Published :
December 01, 2025 8:53 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : विराटच्या शतकानंतर रोहितचं ऍन्ग्री सेलिब्रेशन, हिटमॅनने कोणते शब्द वापरले? अर्शदीपने थेट सांगितलं, Video


