Shubman Gill : शुभमन गिलची प्रकृती ढासळली, तडकाफडकी रुग्णालयात दाखल, टीम इंडिया टेन्शनमध्ये!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात पहिली टेस्ट सुरू आहे, पण या मॅचदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानात पहिली टेस्ट सुरू आहे, पण या मॅचदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कोलकात्याच्या वुडलँड्स रुग्णालयात शुभमन गिलवर उपचार सुरू आहेत. गिल रात्रभर रुग्णालयातमध्येच डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहणार आहे. कोलकाता टेस्टच्या दुसऱ्या दिवशी बॅटिंगला आल्यानंतर शुभमन गिलची मान अचानक दुखायला लागली, यानंतर तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेला.
3 बॉलमध्ये 4 रन केल्यानंतर गिलला मानदुखीचा त्रास जाणवू लागला, त्यानंतर भारतीय टीमचे डॉक्टर मैदानात आले आणि त्यांनी गिलवर प्रथमोपचार केले, पण तरीही त्याला बरं वाटलं नाही, त्यामुळे त्याने मैदानाबाहेर जायचा निर्णय घेतला. मानेवर पुढील उपचार करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तिकडे त्याला ऍडमिट करून घेण्यात आलं आहे.
कोलकाता टेस्ट रोमांचक स्थितीमध्ये
advertisement
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेचा स्कोअर 93/7 एवढा झाला, त्यांच्याकडे आता 63 रनची आघाडी आहे. रवींद्र जडेजाने 4 तर कुलदीपने 2 आणि अक्षर पटेलने एक विकेट घेतली. दुसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला भारताचा 189 रनवर ऑलआऊट झाला, त्यामुळे टीम इंडियाला 30 रनची छोटी पण महत्त्वाची आघाडी मिळाली. कोलकात्याच्या खेळपट्टीने दुसऱ्या दिवशीच रंग दाखवायला सुरूवात केली आहे, त्यामुळे तिसऱ्या दिवशी सकाळी दक्षिण आफ्रिकेला लवकरात लवकर आऊट करण्याचा भारतीय बॉलर्सचा प्रयत्न असेल.
advertisement
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने मोठ्या स्कोअरकडे मजल मारली तर मात्र भारताला चौथ्या इनिंगमध्ये आव्हानाचा पाठलाग करणं कठीण होऊ शकतं. बॅटिंगची गरज पडली तर गिल मैदानात उतरणार का? याबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे.
view commentsLocation :
Kolkata,West Bengal
First Published :
November 15, 2025 9:38 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Shubman Gill : शुभमन गिलची प्रकृती ढासळली, तडकाफडकी रुग्णालयात दाखल, टीम इंडिया टेन्शनमध्ये!


