IND vs SA : शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN? दुसऱ्या टी20 साठी अशी असेल भारताची प्लेइंग XI

Last Updated:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा टी20 सामना हा चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उद्या 11 डिसेंबर 2025 ला खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया काही बदल करण्याची शक्यता आहे.

ind vs sa 2nd t20i
ind vs sa 2nd t20i
India vs South Africa 2nd T20i : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा टी20 सामना हा चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर उद्या 11 डिसेंबर 2025 ला खेळवला जाणार आहे. या सामन्यात टीम इंडिया काही बदल करण्याची शक्यता आहे. कारण टीम इंडियाचं टॉप ऑर्डर पुर्णताह फेल ठरले आहे. टीम इंडियाचा ओपनर शुभमन गिल गेल्या अनेक सामन्यापासून फ्लॉप ठरतोय. तरी देखील त्याला संघात संधी देण्यात येत आहे. त्याच्यामुळे संजू सॅमसनची संघात निवड होत नाही आहे.त्यामुळे शुभमन गिलला बेंचवर बसवून त्याच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळण्याची शक्यता आहे.
खरं तर टीम इंडियाच्या खराब बॅटींगनंतर धावसंख्या चांगली गाठली होती. आणि भारताने हा सामना देखील जिंकला होता. त्यामुळे विजयानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता कमीच आहे. दुसऱ्या सामन्यात कोणतेही महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित नाहीत. कठीण परिस्थितीत भारताने सामना त्यांच्या बाजूने वळवला आणि त्यानंतर, संघ कदाचित त्याच 11 खेळाडूंना मैदानात उतरवू इच्छित असेल, अशी माहिती मिळते आहे का?
advertisement
संजूला संधी मिळणार का? 
एकीकडे शुभमन गिल सतत सलामीला फ्लॉप ठरतो आहे. तर दुसरीकडे संजू सॅमसनला सतत बेंचवरच बसवलं जात आहे. पण असे जरी असले तरी शुभमन गिलच्या जागी संजू सॅमसनला जागा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे. जितेश शर्माच्या जागी देखील संजूला संधी मिळण्याची शक्यता होत.पण पहिल्या टी20 मध्ये जितेशच्या कॅमिओ भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले, त्यामुळे जितेशची जागा संजू सॅमसन घेईल अशी शक्यता कमीच दिसते.
advertisement
टीम इंडियाच्या गोलंदाजीबाबत बोलायचं झालं तर टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांच्यातील खेळपट्टीवर आधारित असल्याचे दिसते. जर खेळपट्टी फिरकी ट्रॅक असेल तर कुलदीप यादवला संधी दिली जाऊ शकते आणि जर नसेल तर संघ अर्शदीप सिंगसोबत जाईल. जर असे झाले तर, ट्रॅकच्या आधारे अर्शदीप आणि कुलदीप यांच्यातील निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ नसेल.
advertisement
कशी आहे खेळपट्टी?
मुल्लानपूर स्टेडियमबद्दल बोलायचे झाले तर, येथील खेळपट्टी फलंदाजी आणि गोलंदाजी दोघांसाठीही तितकीच अनुकूल आहे. तथापि, आउटफिल्ड वेगवान आहे, ज्यामुळे नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला फायदा होईल. फलंदाज सुरुवातीला चौकार आणि षटकार मारू शकतात. तथापि, खेळ जसजसा पुढे जाईल तसतसे फिरकीपटूंना मदत मिळू लागेल. तथापि, दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे देखील कठीण होईल. कारण येथे दव महत्त्वाची भूमिका बजावू शकते.
advertisement
"हा योग्य निर्णय आहे. जर संजू फलंदाजी क्रमात पहिल्या तीनमध्ये नसेल आणि यष्टीरक्षक मधल्या फळीत फलंदाजी करत असेल, तर तुम्ही टॉप ऑर्डरच्या फलंदाजापेक्षा एका विशेषज्ञ खालच्या फळीतील फलंदाजाला संघात समाविष्ट करणे पसंत कराल, असे माजी भारतीय यष्टीरक्षक दीप दासगुप्ता यांनी पीटीआयला सांगितले.प्रत्येक खेळाडूसाठी दोन किंवा चार चेंडू फलंदाजी करणे सोपे नाही. जितेश या क्षेत्रातील तज्ञ आहे." तो पुढे म्हणाला, "विश्वचषकापूर्वी भारताला नऊ सामने खेळायचे आहेत." टी-२० विश्वचषकापूर्वी मला फारसे बदल अपेक्षित नाहीत."
advertisement
दुसऱ्या टी20 साठी भारताचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा/संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग/कुलदीप यादव
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : शुभमन गिल OUT, संजू सॅमसन IN? दुसऱ्या टी20 साठी अशी असेल भारताची प्लेइंग XI
Next Article
advertisement
Gold Price Prediction : आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी
  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

  • आताच सोनं खरेदी करावं की पुढील वर्षाची वाट पाहावी? एक्सपर्टची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement