IND vs SA : आधी होणार टी ब्रेक, मग लंच... भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी टेस्ट किती वाजता सुरू होणार?

Last Updated:

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला शनिवार 22 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही.

आधी होणार टी ब्रेक, मग लंच... भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी टेस्ट किती वाजता सुरू होणार?
आधी होणार टी ब्रेक, मग लंच... भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी टेस्ट किती वाजता सुरू होणार?
गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्टला शनिवार 22 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकणार नाही, त्याच्याऐवजी ऋषभ पंतला टीम इंडियाचं कर्णधार करण्यात आलं आहे. कोलकात्यामधली पहिली टेस्ट गमावल्यानंतर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे, त्यामुळे मॅच जिंकून सीरिज वाचवण्याचं आव्हान भारतापुढे आहे. गुवाहाटीमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होत असल्यामुळे या मॅचची वेळही वेगळी असणार आहे.
गुवाहाटीमध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅच होणार आहे, तर ऋषभ पंत हादेखील पहिल्यांदाच भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. भारताकडून टेस्ट टीमचं नेतृत्व करणारा तो 38 वा खेळाडू बनणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर कागिसो रबाडाही दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
कधी होणार भारत-दक्षिण आफ्रिका टेस्ट?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट मॅच 22 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबरदरम्यान खेळवली जाणार आहे.
advertisement
कोणत्या स्टेडियमवर होणार सामना?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी टेस्ट गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे.
किती वाजता सुरू होणार सामना?
टीम इंडियाचा कर्णधार ऋषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बऊमा सकाळी 8.25 वाजता टॉससाठी मैदानात येतील, तर 8.30 वाजता टॉस होईल, यानंतर प्रत्येक दिवशी मॅच सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 4.30 वाजता संपेल.
advertisement
टी ब्रेक लंच ब्रेकमध्ये अदलाबदली
टेस्ट क्रिकेटमध्ये दिवसाला 3 सत्रांमध्ये खेळ होते, पहिल्या सत्रानंतर लंच आणि दुसऱ्या सत्रानंतर टी ब्रेक होतो, पण गुवाहाटीमध्ये ब्रेकची अदलाबदली करण्यात आली आहे. पहिल्या सत्रानंतर टी ब्रेक होईल तर दुसऱ्या सत्रानंतर लंच ब्रेक होणार आहे. गुवाहाटीमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्त लवकर होतो, त्यामुळे लंच आणि टी ब्रेकची अदलाबदली करण्यात आली आहे.
advertisement
पहिलं सत्र- सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत
टी ब्रेक- 11 ते 11.20 वाजेपर्यंत
दुसरं सत्र- सकाळी 11.20 ते दुपारी 1.20 पर्यंत
लंच ब्रेक- दुपारी 1.20 ते दुपारी 2 वाजेपर्यंत
तिसरं सत्र- दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत
कुठे पाहता येणार सामना?
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचचं लाईव्ह प्रेक्षपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तसंच लाईव्ह स्ट्रीमिंग जियो हॉटस्टार ऍप आणि वेबसाईटवर पाहता येईल.
advertisement
भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (कर्णधार विकेट कीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
दक्षिण आफ्रिकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रेयान रिकलटन, एडन मार्करम, वियान मुल्डर, टेम्बा बऊमा (कर्णधार), टोनी डि जॉर्जी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन (विकेट कीपर), मार्को यानसन, कॉर्बिन बॉश, सायमन हार्मर, केशव महाराज
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : आधी होणार टी ब्रेक, मग लंच... भारत-दक्षिण आफ्रिका दुसरी टेस्ट किती वाजता सुरू होणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement