IND vs SA : साऊथ अफ्रिकेने 2 दिवस वाया घालवले, 3 दिवसात मॅच जिंकायची कशी? रवी शास्त्रींनी सांगितला धाडसी फॉर्म्युला!

Last Updated:

Ravi Shastri On Guwahati Test : भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या कठीण प्रसंगी रिषभ पंत आणि त्याच्या टीमला एक धाडसी सल्ला दिला आहे

Ravi Shastri On Guwahati Test
Ravi Shastri On Guwahati Test
Ravi Shastri On Guwahati Test : गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. मालिकेतील पहिला सामना गमावल्यामुळे या निर्णायक लढतीत यजमान संघावर दडपण वाढले असून, ही सिरीज वाचवण्यासाठी हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी अत्यंत गरजेचे बनले आहे. पहिल्या दोन दिवसांच्या खेळावर नजर टाकल्यास येथील खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याचे दिसून आले, ज्याचा पाहुण्या संघाने पुरेपूर फायदा उचलला आहे. आता भारतीय संघाला केवळ चांगला खेळ करून चालणार नाही, तर रणनीतीमध्येही मोठा बदल करावा लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा 489 धावांचा डोंगर

दक्षिण आफ्रिकेने आपल्या पहिल्या डावात तब्बल 489 धावांचा डोंगर उभा केला आहे. सेनुरन मुथुसामीने उत्कृष्ट फलंदाजी करत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आणि 109 धावा केल्या. त्याला मार्को जान्सेनची चांगली साथ मिळाली, जो दुर्दैवाने शतकापासून हुकला आणि 93 धावांवर बाद झाला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने बिनबाद 9 धावा केल्या होत्या. सध्या भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेपेक्षा 480 धावांनी पिछाडीवर असून, तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे.
advertisement

80 ते 100 धावा कमी असतानाच डाव घोषित करा 

भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या कठीण प्रसंगी रिषभ पंत आणि त्याच्या टीमला एक धाडसी सल्ला दिला आहे. ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवायची असेल, तर भारताला पारंपारिक खेळापेक्षा वेगळा विचार करावा लागेल, असे शास्त्री यांचे मत आहे. कॉमेंट्री दरम्यान बोलताना त्यांनी सुचवलं की, भारताने दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या ओलांडण्याच्या फंदात पडू नये. त्याऐवजी, वेळेची बचत करण्यासाठी भारताने प्रतिस्पर्ध्याच्या धावसंख्येपेक्षा 80 ते 100 धावा मागे असतानाच आपला डाव घोषित करावा.
advertisement

रवी शास्त्रींंचा मोलाचा सल्ला

शास्त्री यांच्या मते, तिसऱ्या दिवशी खेळाची दिशा ठरवणे महत्त्वाचे ठरेल. नवीन बॉल हाताळल्यानंतर भारताने आक्रमक निर्णय घेणे अपेक्षित आहे. जर भारताने पूर्ण धावा करण्याचा प्रयत्न केला, तर त्यात खूप वेळ जाईल आणि मॅच अनिर्णित राहण्याची शक्यता वाढेल. त्यामुळे विजयासाठी थोडा धोका पत्करून, कमी धावांवर डाव घोषित करावा आणि दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला लवकरात लवकर बाद करण्याचा प्रयत्न करावा, असा मोलाचा सल्ला रवी शास्त्री यांनी दिला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : साऊथ अफ्रिकेने 2 दिवस वाया घालवले, 3 दिवसात मॅच जिंकायची कशी? रवी शास्त्रींनी सांगितला धाडसी फॉर्म्युला!
Next Article
advertisement
Raj Thackeray MNS: 'राज ठाकरे मेरा XXX,  इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
'राज ठाकरे मेरा XXX, कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात परप्रांतीयांचा धिंगाणा
  • 'राज ठाकरे मेरा XXX, इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तर

  • 'राज ठाकरे मेरा XXX, इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तर

  • 'राज ठाकरे मेरा XXX, इधर कोई मराठी आया तो उसकी...', ठाण्यात मद्यपी परप्रांतीय तर

View All
advertisement