Gold News: अमेरिकेतील घडामोडींमुळे सोन्याच्या बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांनी काय करावं? एक्सपर्टने सांगितलं...
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold News : अमेरिकेत होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
Gold News : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. सर्वाधिक दराचा उच्चांक गाठल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरण दिसून आली आहे. सोन्याच्या दरात होत असलेल्या घसरणीने ग्राहकांना चेहऱ्यावर समाधान असलं तरी गुंतवणूकदारांना चांगल्या परताव्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर, दुसरीकडे अमेरिकेत होत असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना तज्ज्ञांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
सोन्यातील गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. अनेकजण सुरक्षित आणि दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी सोन्यात गुंतवणूक करतात. मात्र, आता सोन्यातील गुंतवणूक ही फायदेशीर ठरणार की नुकसान देणारी ठरणार, यावर परिणाम करणाऱ्या घडामोडी अमेरिकेत घडत आहेत.
अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या पुढील धोरणात्मक निर्णयाबाबत वाढत्या अनिश्चिततेमुळे सोमवारी आशियाई बाजारात सोन्याचे भाव जवळजवळ स्थिर राहिले. वर्षाच्या अखेरीस फेड पुन्हा दर कपात करू शकते का याचा अंदाज गुंतवणूकदार घेत आहेत. २४ नोव्हेंबर रोजी वायदे बाजारात २४ कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत प्रति औंस ४,०५६ डॉलरवर पोहोचली.
advertisement
आर्थिक अहवालांची प्रतिक्षा...
न्यू यॉर्क फेडचे अध्यक्ष जॉन विल्यम्स यांनी संकेत दिले की कामगार बाजारात अलिकडेच झालेल्या मंदीमुळे कर्ज घेण्याच्या खर्चात कपात करण्याची संधी आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर, शुक्रवारी सोने त्याच्या सुरुवातीच्या घसरणीतून सावरले परंतु सत्राचा शेवट थोडासा घसरणीने झाला. दरम्यान, काही इतर फेड अधिकारी सावध राहिले आहेत. त्यामुळे बाजारातील अनिश्चिततेत भर पडली. अमेरिकन सरकारच्या शट डाऊनमुळे अनेक महत्त्वाचे आर्थिक अहवाल वेळेवर जाहीर होऊ शकले नाहीत.
advertisement
कोणते घटक करणार किमतीवर परिणाम?
ट्रेडर्स हे सामान्यतः या अहवालांच्या आधारे दर कपातीच्या शक्यतेवर त्यांचे अंदाज बांधतात. आता, मंगळवारी येणारा सप्टेंबरचा किरकोळ विक्री आणि उत्पादक किंमत डेटा आणि बुधवारी येणारा बेरोजगार दाव्यांचा डेटा बाजाराला पुढील दिशा देऊ शकतो. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक करताना सावधपणे आणि बाजाराचा अंदाज घेऊन गुंतवणूक करावी, असे तज्ज्ञांनी म्हटले.
advertisement
यंदाच्या वर्षात सोनं ५५ टक्क्यांनी महागलं...
गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याचे भाव कंसोलिडेशनच्या टप्प्यात आहेत. २० ऑक्टोबर रोजी ते प्रति औंस ४,३८० डॉलर्सपेक्षा जास्त या विक्रमी उच्चांकावर पोहोचले. तरीही, वर्षाच्या सुरुवातीपासून ते अजूनही जवळजवळ ५५ टक्क्यांहून अधिक आहे. जागतिक व्यापार तणाव, भू-राजकीय जोखीम आणि अनेक देशांच्या बिघडत्या आर्थिक परिस्थितीबद्दल गुंतवणूकदारांच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्याशिवाय, चांदीच्या दरानेही उच्चांक गाठला. त्याशिवाय प्लॅटिनम आणि पॅलेडियममध्ये माफक वाढ झाली.
advertisement
(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा.)
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 24, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold News: अमेरिकेतील घडामोडींमुळे सोन्याच्या बाजारात खळबळ, गुंतवणूकदारांनी काय करावं? एक्सपर्टने सांगितलं...


