IND vs SA : टेस्टमध्ये सिलेक्शन, पण वनडे सीरिजमधून डच्चू, टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचा पत्ता कट!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. 30 नोव्हेंबरपासून या सीरिजला सुरूवात होणार आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी बीसीसीआयने 15 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. 30 नोव्हेंबरपासून या सीरिजला सुरूवात होणार आहे तर शेवटचा सामना 6 डिसेंबरला होणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल मानदुखीमुळे वनडे सीरिज खेळणार नाही, त्यामुळे केएल राहुलकडे टीमचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजचा भाग असलेले 5 खेळाडू वनडे सीरिजमध्ये खेळू शकणार नाही.
बुमराह-सिराजला विश्रांती
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटीमध्ये सुरू असलेल्या टेस्टमध्ये हे दोघं खेळत आहेत. वनडे सीरिजमध्ये त्यांच्या जागी हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा यांना वनडे टीममध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.
दोन बॅटरनाही वगळलं
सध्या भारताच्या टेस्ट टीममध्ये असलेल्या साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांनाही वनडे टीममध्ये स्थान देण्यात आले नाही. साई सुदर्शनला पहिल्या टेस्टमध्ये संधी मिळाली नाही, पण दुसऱ्या कसोटीसाठी तो प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला. दुसरीकडे, पडिक्कलला दोन्ही टेस्टमध्ये स्थान देण्यात आले नाही. पडिक्कलने अजून वनडेमध्ये पदार्पण केलेले नाही. सुदर्शनने आतापर्यंत तीन वनडे सामने खेळले आहेत.
advertisement
अक्षर पटेललाही स्थान नाही
स्टार ऑलराऊंडर अक्षर पटेललाही वनडे सीरिजमधून वगळण्यात आले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी अक्षर पटेल प्लेइंग इलेव्हनमध्ये होता, पण दुसऱ्या सामन्यात त्याला स्थान देण्यात आले नाही. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये तो तिन्ही सामने खेळला.
वनडे सीरिजसाठी भारतीय टीम
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार, विकेट कीपर), ऋषभ पंत (विकेट कीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 11:44 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : टेस्टमध्ये सिलेक्शन, पण वनडे सीरिजमधून डच्चू, टीम इंडियाच्या 5 खेळाडूंचा पत्ता कट!


