VIDEO : सगळे गुवाहाटी टेस्ट पाहत बसले, कुणाला कळालं नाही, भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिकला, रोहित स्टाईल सेलिब्रेशनची चर्चा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सगळेजण ही गुवाहाटी टेस्ट पाहत असताना तिकडे भारताच्या पोरींनी मोठा पराक्रम केला आहे. भारताच्या महिला क्रिकेटरने आणखी एक वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे या विजयाची सर्वदूर चर्चा रंगली आहे.
Team India Women Won world Cup : भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यात गुवाहाटीच्या बारसपारा स्टेडिअमवर दुसरा टेस्ट सामना सूरू आहे. या सामन्यात आज टीम इंडियाला फलंदाजीची करण्याची संधी मिळेल, या हेतूने सगळ्यांचे या सामन्याकडे लक्ष होते. पण सगळेजण ही गुवाहाटी टेस्ट पाहत असताना तिकडे भारताच्या पोरींनी मोठा पराक्रम केला आहे. भारताच्या महिला क्रिकेटरने आणखी एक वर्ल्ड कप जिंकला आहे. त्यामुळे या विजयाची सर्वदूर चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या विजयानंतर ज्याप्रमाण रोहित शर्माने वर्ल्ड कप स्विकारल्यानंतर सेलीब्रेशन केलं होतं, तशाच प्रकारचं सेलीब्रेशन भारताच्या या महिला खेळाडूंनी केले आहे.या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
advertisement
खरं तर रविवारी कोलंबोमधील पी. सारा ओव्हल मैदानात भारत आणि नेपाळ यांच्यात फायनलचा सामना रंगला होता.या सामन्यात भारताने नेपाळचा 7 विकेटस राखून पराभव केला होता.त्यामुळे या विजयामुळे भाराताच्या महिला संघाने पहिला टी20 ब्लाइंड महिला वर्ल्ड कप जिंकला होता. हा वर्ल्ड कप जिंकून भारतीय संघाने इतिहास रचला होता.
advertisement
विशेष म्हणजे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर भारताच्या महिला संघाच्या कर्णधाराने रोहित शर्माने ज्या प्रकारे टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सेलीब्रेशन केले होते. त्याच स्टाईलमध्ये आता महिला संघाच्या कर्णधाराने सेलीब्रेशन केले आहे.या सेलिब्रेशनचा आता व्हिडिओ देखील समोर आला आहे.
दरम्यान प्रथम गोलंदाजी करताना भारताने नेपाळला 5 बाद 114 धावांवर रोखले. त्यानंतर भारताने फक्त 12 षटकांत 3 बाद 117 धावा करून विजेतेपद मिळवले. भारताचे वर्चस्व असे होते की त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या डावात फक्त एकच चौकार मारता आला. धावांचा पाठलाग करताना भारताकडून फुला सरीनने सर्वाधिक 44 धावा केल्या. पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला, तर शनिवारी दुसऱ्या उपांत्य सामन्यात नेपाळने पाकिस्तानचा पराभव केला होता.
advertisement
अंतिम सामन्याने स्पर्धेतील एक उल्लेखनीय धावसंख्या पूर्ण केली. भारताने साखळी फेरीत श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, नेपाळ, अमेरिका आणि पाकिस्तानचा पराभव केला आणि त्यानंतर उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नऊ विकेट्सने हरवले. भारत आणि श्रीलंकेने आयोजित केलेला विश्वचषक ११ नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली, बेंगळुरू आणि कोलंबो येथे खेळवण्यात आला.
सामने मानक अंध-क्रिकेट नियमांनुसार खेळवले गेले, ज्यामध्ये संघांनी B1, B2 आणि B3 खेळाडूंना मैदानात उतरवले आणि फॉरमॅटनुसार ऐकू येणारा आवाज असलेला पांढरा प्लास्टिक बॉल वापरला. पाकिस्तानची मेहरीन अली या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांपैकी एक होती, तिने श्रीलंकेविरुद्ध 78 चेंडूत 230 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 133 धावा केल्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 23, 2025 11:33 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : सगळे गुवाहाटी टेस्ट पाहत बसले, कुणाला कळालं नाही, भारताच्या पोरींनी वर्ल्ड कप जिकला, रोहित स्टाईल सेलिब्रेशनची चर्चा


