Rohit Sharma : गिल-अय्यरला दुखापत, रोहित पुन्हा कॅप्टन होणार? आगरकर-गंभीरच्या मनात चाललंय काय

Last Updated:

भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिल हा सध्या दुखापतग्रस्त आहे, तर श्रेयस अय्यरही फिट झालेला नाही. या दोघांच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी रोहित शर्मा कर्णधार होईल का? अशा चर्चा सुरू आहेत.

गिल-अय्यरला दुखापत, रोहित पुन्हा कॅप्टन होणार? आगरकर-गंभीरच्या मनात चाललंय काय
गिल-अय्यरला दुखापत, रोहित पुन्हा कॅप्टन होणार? आगरकर-गंभीरच्या मनात चाललंय काय
मुंबई : भारताच्या टेस्ट आणि वनडे टीमचा कर्णधार शुभमन गिल हा सध्या दुखापतग्रस्त आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये गिलच्या मानेला दुखापत झाली, त्यामुळे तो दुसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे, तसंच त्याचं वनडे सीरिजमध्ये खेळणंही कठीण आहे. दुसरीकडे वनडे टीमचा उपकर्णधार श्रेयस अय्यर यालाही दुखापत झाली आहे, त्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे. टीमचे कर्णधार आणि उपकर्णधार फिट नसल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टीमचा कर्णधार कोण असणार? याचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागणार आहे.
भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी दिंकली असली तरी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे सीरिजआधी रोहितची कॅप्टन्सी काढून गिलला कर्णधार करण्यात आलं, पण आता गिल दुखापतग्रस्त झाला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या शेवटच्या वनडेमध्ये श्रेयस अय्यरलाही दुखापत झाली आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अय्यर अजूनही फिट झाला नसल्यामुळे त्याची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे.
advertisement

रोहित शर्मा पुन्हा कॅप्टन होणार?

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने 56 सामन्यांमध्ये 42 विजय मिळवले आहेत, पण 2027 वर्ल्ड कप लक्षात घेता निवड समिती रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन्सी देण्याची शक्यता कमी आहे. तसंच रोहित शर्मा स्वतः स्टँड-इन कर्णधार म्हणून हा प्रस्ताव स्वीकारणंही कठीण आहे. निवड समितीसमोर विराट कोहलीचाही पर्याय आहे, तसंच त्याचा कॅप्टन्सी रेकॉर्डही चांगला आहे, पण विराटने 2021 नंतर टीमचं नेतृत्व केलेलं नाही. निवड समिती आणि बीसीसीआय रोहितप्रमाणेच विराटचा विचार करण्याची शक्यता कमी आहे.
advertisement

केएल राहुल करणार नेतृत्व?

गिल फिट झाला नाही तर यशस्वी जयस्वाल ओपनर म्हणून गिलची जागा घेईल, तर श्रेयस अय्यरच्या जागी चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंतला संधी मिळू शकते. गिलच्या गैरहजेरीत ऋषभ पंत टेस्ट टीमचं नेतृत्व करणार असला, तरी पंतला वनडे टीमची कॅप्टन्सी मिळण्याची शक्यता कमी आहे. तर हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांना वनडे सीरिजसाठी विश्रांती दिली जाऊ शकते, या परिस्थितीमध्ये केएल राहुल हा कॅप्टन्सीसाठी एकमेव पर्याय उरतो.
advertisement

कधी होणार वनडे सीरिज?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वनडे सीरिज 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे, तर शेवटचा सामना 6 डिसेंबरला होईल. या तीन वनडे रांची, रायपूर आणि विशाखापट्टणम येथे खेळवले जाणार आहेत. वनडे सीरिज संपल्यानंतर दोन्ही टीममध्ये 5 टी-20 मॅचची सीरिज होईल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : गिल-अय्यरला दुखापत, रोहित पुन्हा कॅप्टन होणार? आगरकर-गंभीरच्या मनात चाललंय काय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement