हार्दिक पांड्याने गुपचूप उरकला साखरपूडा? पण त्या व्हिडिओने गेम केला, सगळंच फुटेज समोर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माने गुपचूप साखरपूडा उरकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे.
Hardik Pandya Mahika Sharma News : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियापासून दूर आहे.सध्या तो त्याची मैत्रिण माहिका शर्मा आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवताना दिसतो आहे. या संदर्भातले फोटो देखील समोर आले होते. पण आता हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माने गुपचूप साखरपूडा उरकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या संबंधित व्हिडिओ देखील समोर आला आहे. पण याबाबत हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा यांच्याकडून साखरपूड्याबाबत कोणतीच पुष्टी देण्यात आलेली नाही आहे.
खरं तर पीइंगमुन नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून हार्दिक पंड्या आणि माहिका शर्माचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.या व्हिडिओमध्ये दोघे एकत्र पूजा करताना दिसत आहेत. आणि एक पुजारी त्यांना आशीर्वाद देत आहे. त्यानंतर हार्दिकने त्याच पोशाखात एक व्हिडिओ आणि फोटो देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये माहिकाच्या बोटात अंगठी दिसत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या आणि माहिका शर्माने गुपचूप साखरपूडा उरकल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
advertisement
2025 च्या आशिया कपनंतर हार्दिक पंड्या खेळापासून दूर असल्याने, तो माहिका शर्मासोबत दिसला आहे. त्याच्या प्रत्येक पोस्टमध्ये माहिका शर्मा दिसते. कधी ते एकमेकांना किस करताना दिसतात, तर कधी शांत समुद्रकिनाऱ्यावरील सुट्टीवर निघतात. कधी स्विमिंग पूलमध्ये, जिममध्ये आणि आता पूजांमध्ये एकत्र पाहिले गेले आहे. त्यामुळे, त्यांचे नाते खास आहे यात काही शंका नाही.पण अद्याप दोघांनीही साखरपूडा झाला असल्याची पुष्टी दिलेली नाही आहे.
advertisement
दरम्यान हार्दिक पंड्याची नवीन मैत्रीण, माहिका शर्मा, एक फॅशन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने तिच्या कारकिर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली. ती 2019 मध्ये विवेक ओबेरॉय सोबत पीएम नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपटातही दिसली होती. ती रॅपर रागाच्या एका म्युझिक व्हिडिओमध्येही दिसली आहे. 2024 च्या इंडियन फॅशन अवॉर्ड्समध्ये तिला मॉडेल ऑफ द इयर म्हणूनही निवडण्यात आले होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 10:35 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
हार्दिक पांड्याने गुपचूप उरकला साखरपूडा? पण त्या व्हिडिओने गेम केला, सगळंच फुटेज समोर


