Pune Crime : ज्या ठिकाणी हत्या केली, तिथेच पोलिसांनी आरोपींचा उतरवला माज, VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आरोपींनी ज्या ठिकाणी तरूणाची हत्या केली होती, त्याच ठिकाणी आता त्यांची धिंड काढण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या या कारवाईने किमान गुन्हेगारीवर नियंत्रण येईल,अशी आशा सामान्य नागरीक बाळगतायत.
Pune Crime News : अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे : पुण्याच्या सिंहगड रोड परिसरातील सिंहगड कॉलेज जवळ सोमवारी 17 नोव्हेंबर 2025 कोयत्याने आणि दगडाने ठेचून हत्या केली होती. तौफिर शेख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव होतं. या घटनेचा तीन दिवसानंतर पाच जणांच्या या टोळीला अटक केली आहे. या आरोपींनी ज्या ठिकाणी तरूणाची हत्या केली होती, त्याच ठिकाणी आता त्यांची धिंड काढण्यात आली आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या या कारवाईने किमान गुन्हेगारीवर नियंत्रण येईल,अशी आशा सामान्य नागरीक बाळगतायत.
सिंहगड रोड भागातील मिनाक्षीपुरम परिसरातील कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमधे दुपारच्या वेळेस तौकीर शेख एकटाच बसलेला होता. त्याचवेळी पाच जणांचे टोळकी अचानक पार्किंगमध्ये शिरली.त्यांनी कोणतीही चर्चा न करता त्यांनी हातातील कोयत्याने तौकीरवर जोरदार हल्ला सुरू केला.त्यामुळे तो काही क्षणांतच रक्ताच्या थारोळ्यात सापडला होता.इतकं रक्तबंबाळ करूनही हल्लेखोर थांबले नाहीत त्यांनी मोठा दगड उचलून तौकीरवर डोक्यावर मारून त्याचा जीव घेतला होता.या घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा सूरू केला होता.मृत तौफिर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती होती.त्यामुळे पूर्ववैमनस्य, पूर्वीचे भांडण, टोळीयुद्ध किंवा अन्य कोणत्या कारणावरून हत्या झाल्याचा संशय होता.या घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र पथके नेमली होती. या पथकांनी पाचही आरोपींना अटक केली होती. या अटकेत असलेल्यांपैकी काही आरोपी अल्पवयीन आहेत.
advertisement
दरम्यान पाचही आरोपींनी अटक केल्यानंतर पोलिसांना त्यांना घटनास्थळी नेऊन त्यांची धिंड काढली आहे. तसेच आरोपींना घटनास्थळावर गुडघ्यावर देखील चालायला लावलं होतं.त्यामुळे ज्या ठिकाणी आरोपींनी हत्या त्याच ठिकाणी पोलिसांनी त्याचा माज उतरवला आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.पोलिसांनी या प्रकरणात दाखवलेल्या तत्परतेमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 20, 2025 11:09 PM IST

