advertisement

IND vs SA : 498 दिवस टीमबाहेर, निवड समितीने हलक्यात घेतलं, पण पठ्ठ्याचं बॅटनं उत्तर, रोहितबरोबर सलामीला खेळणार

Last Updated:

येत्या 30 नोव्हेंबर 2025 भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला सूरूवात होणार आहे.या मालिकेसाठी साऊथ आफ्रिकेने वनडे संघाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर आता टीम इंडियाने वनडे संघाची घोषणा केली आहे.

India vs South Africa Odi
India vs South Africa Odi
India vs South Africa Odi : येत्या 30 नोव्हेंबर 2025 भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील वनडे मालिकेला सूरूवात होणार आहे.या मालिकेसाठी साऊथ आफ्रिकेने वनडे संघाची घोषणा केली होती. या घोषणेनंतर आता टीम इंडियाने वनडे संघाची घोषणा केली आहे. या संघात मराठमोळ्या खेळाडूची एंन्ट्री झाली आहे. या खेळाडूने साऊथ आफ्रिकेविरूद्ध सराव सामन्यात उत्कृष्ट खेळी केली होती.त्याचच बक्षीस आता त्याला मिळालं आहे.
advertisement
हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराज गायकवाड हा मागच्या दीड वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर होता. तसेच त्याला दुखापत झाल्यामुळे तो बराच काळ क्रिकेटपासून लांब होता.पण दुखापतींनंतर कमबॅक करताना ऋतुराजने एक शानदार शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. पहिल्या सामन्यात ऋतुराजने 129 बॉलमध्ये 117 रन केले, ज्यात 12 फोरचा समावेश होता. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 9 फोरच्या मदतीने 83 बॉलमध्ये नाबाद 68 रन केले.
advertisement
भारताने सीरिजमधले दोन सामने जिंकले आणि दोन्ही विजयांमध्ये ऋतुराज गायकवाडने उल्लेखनीय कामगिरी केली, त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या कामगिरीनंतर ऋतुराजची टीम इंडियात कमबॅक होईल असे बोललं जातं होतं आणि आता त्याची टीम इंडियात निवड झाली आहे.
advertisement
ऋतुराजने भारतासाठी शेवटचा टी20 सामना हा झिम्बाब्वेसोबत 13 जुलै 2024 ला खेळला होता.त्यानंतर आता 498 दिवसांनी त्याची टीम इंडियात एंन्ट्री झाली आहे. विशेष म्हणज ऋतुराज गायकवाडची टीम इंडियात एंन्ट्री झाल्याने आता तो रोहित शर्मासोबत ओपनिंगला उतरणा आहे.
advertisement
दक्षिण आफ्रिका वनडे सीरिजसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार/विकेट कीपर), ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल
advertisement
वनडे सीरिजचं वेळापत्रक
पहिली वनडे- 30 नोव्हेंबर, रांची
दुसरी वनडे- 3 डिसेंबर, रायपूर
तिसरी वनडे - 6 डिसेंबर, विशाखापट्टणम
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA : 498 दिवस टीमबाहेर, निवड समितीने हलक्यात घेतलं, पण पठ्ठ्याचं बॅटनं उत्तर, रोहितबरोबर सलामीला खेळणार
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement