IND vs SL : हरमनचा कॅप्टन्स नॉक, दीप्तीने इतिहास घडवला, भारताने लागोपाठ 5 सामन्यांमध्ये लंकेला चिरडलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
भारतीय महिला टीमने पाचवा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकून श्रीलंकेविरुद्धचा मालिका विजय पूर्ण केला.
मुंबई : भारतीय महिला टीमने पाचवा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकून श्रीलंकेविरुद्धचा मालिका विजय पूर्ण केला. तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पहिले बॅटिंग करताना भारताने 7 बाद 175 रन केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेला 160 रन करता आल्या. श्रीलंकेची ओपनर हसिनी परेरा आणि तिसऱ्या क्रमांकाची इमेशा दुलानी यांनी अर्धशतके झळकावून विजयाच्या आशा उंचावल्या. पण, भारतीय बॉलरनी योग्य वेळी दोघींनाही आऊट केले, ज्यामुळे भारताचा विजय झाला, याचसोबत टीम इंडियाने श्रीलंकेला 5-0 ने व्हाईट वॉश केलं आहे.
भारताची खराब सुरूवात
प्रथम बॅटिंग करताना, भारताने 7 बाद 175 रन केल्या, पण त्यांची सुरुवात खराब झाली. शफाली वर्मा (5 रन) आणि पदार्पण करणारी जी. कमलिनी (12 रन) स्वस्तात आऊट झाल्यानंतर भारताने 77 रनमध्येच पाच विकेट गमावल्या. पण हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत भारताला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. तिने अमनजोत कौर (21 रन) सोबत सहाव्या विकेटसाठी 61 रनची पार्टनरशीप करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. हरलीन देओल (13), रिचा घोष (5) आणि दीप्ती शर्मा (7) देखील कमी स्कोअरवर माघारी परतल्या.
advertisement
हरमनप्रीत कौरने 43 बॉलमध्ये 9 फोर आणि एका सिक्ससह 68 रनची खेळी केल्या. अमनजोत कौरनेही 21 रनचे योगदान दिले. हरमनप्रीत व्यतिरिक्त, अरुंधती रेड्डीने शेवटच्या दोन ओव्हरमध्ये धमाकेदार खेळी करत भारताला 170 रनच्या पुढे नेले. अरुंधतीने 11 बॉलमध्ये 4 फोर आणि एका सिक्ससह नाबाद 27 रन केल्या. स्नेह राणा आठ रनवर नाबाद राहिली. श्रीलंकेकडून कविशा दिलहारी, रश्मिका सेववंडी आणि चामारी अटापट्टूने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. निमाशा मदुशानीला एक विकेट घेण्यात यश आलं.
advertisement
लक्ष्याचा पाठलाग करताना, श्रीलंकेच्या बॅटर हसिनी परेरा आणि इमेशा दुलानी यांनी त्यांच्या टीमला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना यात यश आले नाही. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 79 रनची शानदार पार्टनरशीप केली, तेव्हा श्रीलंकेचा सहज विजय होईल, असे वाटत होते. पण, इमेशा आऊट झाल्यानंतर, श्रीलंकेची बॅटिंग कोसळली. काही वेळातच हसिनीनेही आपली विकेट गमावली आणि श्रीलंकेच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. इमेशाने 50 रन केल्या आणि हसिनीने 65 रनची खेळी केली.
advertisement
दीप्तीने इतिहास घडवला
दीप्ती शर्माने या सामन्यात इतिहास घडवला आहे. दीप्ती शर्मा आंतरराष्ट्रीय महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी क्रिकेटपटू ठरली आहे. दीप्तीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत 152 विकेट घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मेगन शुटच्या 151 विकेटचा विक्रम दीप्तीने मोडित काढला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 30, 2025 11:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SL : हरमनचा कॅप्टन्स नॉक, दीप्तीने इतिहास घडवला, भारताने लागोपाठ 5 सामन्यांमध्ये लंकेला चिरडलं!









