IND vs SL : अक्षर पटेलमुळे सुपर ओव्हरमध्ये गेली मॅच... 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मोठी चूक, काय घडलं? पाहा Video

Last Updated:

IND vs SL 20th thriller over : श्रीलंकेला विजयासाठी 3 धावांची गरज होती. शनाकाने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण टायमिंग चुकलं अन् इथंच टीम इंडियाने दोन मोठ्या चुका केल्या.

IND vs SL match in super over due to axar patel
IND vs SL match in super over due to axar patel
India vs Sri Lanka Super Over : आशिया कप 2025 मधील सुपर 4 फेरीतील भारत आणि श्रीलंका यांच्यातील मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगली आणि अक्षरशः नाट्यमय झाली. दोन्ही संघांनी निर्धारित 20 ओव्हरमध्ये 202 धावा केल्याने मॅच टाय झाली आणि याचा निर्णय सुपर ओव्हरमध्ये लागला. टीम इंडियाने ही मॅच सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर जिंकत स्पर्धेत आपली सलग सहावी विक्रमी नोंद केली आणि दिमाखात फायनलमध्ये प्रवेश केला. पण अक्षर पटेलच्या एका चुकीमुळे टीम इंडियाला मॅच गमवावी लागली असती. अखेरच्या सेकंदात नेमकं काय घडलं? पाहा

शनाकाचं टायमिंग चुकलं अन् मॅच गमावली

मॅचच्या शेवटच्या ओव्हरमध्ये श्रीलंकेला विजयासाठी 12 धावांची गरज होती. कर्णधार सूर्यकुमार यादवने युवा बॉलर हर्षित राणाकडे बॉल सोपवला. राणाने पहिलीच बॉल पथुम निसंकाला टाकली आणि सेट बॅटर असलेल्या निसंकाला (107) आउट करत भारताच्या विजयाच्या आशा वाढवल्या. जैनिथ लियानागेने 2 धावा घेतल्या. लियानागेने 1 रन घेतला (अंपायरने 'बाय' म्हणून काउंट केला). श्रीलंकेला आता 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. दासुन शनाकाने धाव घेत 2 रन पूर्ण केले. शनाकाने महत्त्वाचा फोर मारला. श्रीलंकेला विजयासाठी 3 धावांची गरज होती. शनाकाने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला, पण टायमिंग चुकलं अन् इथंच टीम इंडियाने दोन मोठ्या चुका केल्या.
advertisement

अक्षर पटेलची मोठी चूक

शनाकाने धाव पूर्ण केली असताना बॉल अक्षर पटेलकडे गेला, पण अक्षरने बॉल अचूक जज न केल्याने तो त्याच्या हातून सुटला. फिल्डिंगचा बादशाह असलेल्या अक्षरला बॉल कलेक्ट करून थ्रो करता आला नाही. तर त्यानंतर अक्षरने फेकलेला बॉल बॉलर हर्षित राणाला देखील नीट कलेक्ट करू शकला नाही. या चुकांमुळे श्रीलंकेच्या बॅटर्सनी दुसऱ्या धावेसाठी पळून एक रन पूर्ण केला आणि स्कोर टाय झाला. हीच चूक झाली नसती, तर भारत नॉर्मल ओव्हरमध्येच ही मॅच जिंकू शकला असता.
advertisement
advertisement

टीम इंडियाचा सहज विजय

दरम्यान, सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेने फक्त दोन धावा केल्या. भारताकडून शुभमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव बॅटिंगला आले. श्रीलंकेकडून वानिंदू हसरंगाने बॉलिंग केली. हसरंगाच्या पहिल्याच बॉलवर सूर्यकुमार यादवने 3 धावा घेत टीम इंडियाला सहज विजय मिळवून दिला आणि अक्षर आणि राणा यांच्या चुकांवर पडदा टाकला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SL : अक्षर पटेलमुळे सुपर ओव्हरमध्ये गेली मॅच... 20 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मोठी चूक, काय घडलं? पाहा Video
Next Article
advertisement
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री, 'या' अभिनेत्यासाठी वेडी
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
    View All
    advertisement