Asian Games : भारताने पाकिस्तानला नमवले, स्क्वॅशमध्ये 9 वर्षांनी सुवर्णपदकाला गवसणी

Last Updated:

पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या भारताने पुढच्या दोन गेममध्ये जबरदस्त खेळ करत पाकिस्तानला नमवले.

News18
News18
दिल्ली, 30 सप्टेंबर : एशियन गेम्समध्ये भारतीय पुरुषांच्या स्क्वॅश संघाने सुवर्णपदक पटकावलं. अंतिम सामन्यात भारताची लढत पाकिस्तानशी झाली. पाकिस्तानला नमवत भारताने सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारताच्या स्क्वॅश संघाला जवळपास ९ वर्षांनी सुवर्णपदक पटकावता आलं. पाकिस्तानविरुद्धचा हा सामना उत्कंठावर्धक असा होता. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडलेल्या भारताने पुढच्या दोन गेममध्ये जबरदस्त खेळ करत पाकिस्तानला नमवले.
अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला २-१ ने हरवत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात दोन्ही संघात तुल्यबळ लढत झाली. सामन्यातला पहिला गेम पाकिस्तानने जिंकला. मात्र त्यानंतर भारताने कमालीचा खेळ करत पुढचे दोन्ही गेम जिंकून सामन्यात विजय मिळवला.
advertisement
दुसऱ्या गेममध्ये भारताने पुनरागमन करत बरोबरी साधली. तर तिसऱ्या गेममध्ये रोमहर्षक खेळ बघायला मिळाला. पण यामध्ये भारताने बाजी मारली. फायनलमधील तिसऱ्या गेममध्ये अभिय सिंहने कौतुकास्पद कामगिरी केली. त्याने पाकिस्तानच्या जमान नूरला हरवत सुवर्णपदक जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
अभय सिंहच्या आधी दुसऱ्या गेममध्ये सौरव घोषालने मुहम्मद आसिम खानला हरवत बरोबरी साधली. त्याआधी पाकिस्तान आघाडीवर होते. पहिल्या गेममध्ये पाकिस्तानच्या नासिर इकबालने भारताच्या महेश मनगांवरला हरवलं होतं.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : भारताने पाकिस्तानला नमवले, स्क्वॅशमध्ये 9 वर्षांनी सुवर्णपदकाला गवसणी
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement