IND vs AUS : टीम इंडियाचे 11 खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना, पण 'हा' ऑलराऊंडर भारताच थांबणार! कारण काय?

Last Updated:

Indian Cricket Team : टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली असताना आता, मुंबईच्या ऑलराऊंडर खेळाडूला पाठीचा त्रास झाला आणि तो मंगळवारी रात्री मुंबईत परतला आहे.

News18
News18
India vs Australia ODI series : भारतीय संघाचा पहिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. 19 ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे आणि त्यानंतर पाच सामन्यांची टी-ट्वेंटी मालिका होणार आहे. तथापि, त्यापूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टी-ट्वेंटी संघात समावेश असलेला स्टार ऑलराऊंडर दुखापतग्रस्त झाल्याची माहिती मिळाली आहे.

मंगळवारी रात्री मुंबईत परतला

मुंबई बुधवारी श्रीनगरमध्ये जम्मू आणि काश्मीरविरुद्ध आपला पहिला रणजी ट्रॉफीचा सामना खेळणार आहे. मुंबईच्या या ऑलराऊंडर खेळाडूला पाठीचा त्रास झाला आणि तो मंगळवारी रात्री मुंबईत परतला. हा ऑलराऊंडर खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून शिवम दुबे आहे. गेल्या महिन्यात भारताच्या आशिया कप विजयात शिवम दुबेने महत्त्वाची भूमिका बजावली होती.
advertisement

शिवमला विश्रांती घेण्याचा सल्ला

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, तो संघासोबत प्रवास केला होता, परंतु थंड हवामानामुळे त्याला पाठीचा कणा जड झाला. संघाच्या वैद्यकीय पथकाने त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला, म्हणून तो मंगळवारी मुंबईत परतला. त्यामुळे आता शुभमन गिलचं नाही तर सूर्यकुमार यादवचं टेन्शन वाढलं आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ (Team India For Australia Tour) : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार) अक्षर पटेल, के एल राहुल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर) यशस्वी जयस्वाल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
advertisement

वनडे सामन्यांचं वेळापत्रक (IND vs AUS ODI Schedule)

19 ऑक्टोबर: पहिला एकदिवसीय सामना, पर्थ.

23 ऑक्टोबर: दुसरा एकदिवसीय सामना, अॅडलेड.
25 ऑक्टोबर: तिसरा एकदिवसीय सामना, सिडनी.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : टीम इंडियाचे 11 खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना, पण 'हा' ऑलराऊंडर भारताच थांबणार! कारण काय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement