Ind vs Eng 1st Test: शुभमन गिलच्या आधी रहाणेनं निवडली Playing XI, दोन मोठ्या स्टार खेळाडूंना संधी नाही

Last Updated:

Tendulkar-Anderson Trophy: अजिंक्य रहाणेच्या म्हणण्यानुसार, इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील कॅप्टन्सी निभावणं जास्त आव्हानात्मक ठरणार आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने तो याही कसोटीत चांगला परफॉर्मन्स देईल याची मला खात्री आहे

अजिंक्य रहाणे
अजिंक्य रहाणे
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड पहिला कसोटी सामना आज होत आहे. या कसोटी सामन्यासाठी टीम इंडियाचे नवे दमदार खेळाडू तयार झाले आहेत. अजिंक्य रहाणेनं प्लेइंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळेल याचं प्रेडिक्शन दिलं आहे. विशेष म्हणजे, रहाणेने आपल्या संघात करुण नायर आणि प्रसिद्ध कृष्णाला टीममध्ये घेतलेलं नाही. इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेची सुरुवात 20 जूनपासून हेडिंग्ले मैदानावर होत आहे. या मालिकेत भारताकडून रोहित शर्मा, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद शमी हे अनुभवी खेळाडू अनुपस्थित असणार आहेत. त्यामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.
करुण नायरने गेल्या वर्षभरात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला परफॉर्मन्स केला आहे. तब्बल 8 वर्षांनंतर तो कमबॅक करत आहे. तर प्रसिद्ध कृष्णा हा आयपीएल 2025 मधील पर्पल कॅप विजेता असून, ऑस्ट्रेलियातील दौऱ्यात भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज होता. तरीही रहाणेने या दोघांची निवड केली नाही. रहाणेने आपल्या YouTube चॅनलवर त्याने टीममध्ये कुणाला घेतलं हे आपल्या व्हिडीओमधून सांगितलं आहे.
advertisement

IndvsEng: करुण नायर सोडणार टीमची साथ, पहिल्या टेस्टआधी भारतीय क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ!

ओपनिंगसाठी के.एल. राहुलसोबत यशस्वी जैस्वाल तर साई सुदर्शनला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी निवडलं आहे. शुभमन गिलला कर्णधार म्हणून चौथ्या नंबरवर स्थान दिलं असून, पाचव्या क्रमांकावर ध्रुव जुरेल आणि सहाव्या स्थानावर ऋषभ पंतला ठेवण्यात आलं आहे. ऑलराउंडर म्हणून रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूर यांना संधी देण्यात आली आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह आणि डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना निवडलं आहे.
advertisement
टीम इंडिया संभाव्य प्लेइंग XI
यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कॅप्टन), ध्रुव जुरेल, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग,
अजिंक्य रहाणेच्या म्हणण्यानुसार, इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातील कॅप्टन्सी निभावणं जास्त आव्हानात्मक ठरणार आहे. चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने तो याही कसोटीत चांगला परफॉर्मन्स देईल याची मला खात्री आहे. रहाणेनं निवडलेल्या टीमवर चाहते मात्र नाराज झाले आहेत. करुण नायर, कृष्णा यांना डावलून दिली नवख्यांना संधी दिल्याने नाराजी व्यक्त केली. रहाणेच्या निवडीनं खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता प्रत्यक्षात प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला खेळण्याची संधी मिळणार आणि कोण बेंचवर बसणार ते पाहावं लागणार आहे
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ind vs Eng 1st Test: शुभमन गिलच्या आधी रहाणेनं निवडली Playing XI, दोन मोठ्या स्टार खेळाडूंना संधी नाही
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement