Asian Games 2023: 9 वर्षांचा दुष्काळ संपला, भारतीय हॉकी संघाचं थेट सुवर्णयश, ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा

Last Updated:

Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. पुरुष हॉकी फायनलमध्ये भारताने जपानचा 5-1 असा पराभव केला. पुरुष हॉकीमध्ये भारताने विक्रमी 16व्यांदा पदक जिंकले आहे. यामध्ये 4 सुवर्णपदके आहेत. भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी देखील पात्र ठरला आहे.

9 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाचं सुवर्णयश
9 वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाचं सुवर्णयश
नवी दिल्ली, 6 ऑक्टोबर : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. भारताने अंतिम फेरीत जपानचा दारुण पराभव केला. यासोबतच भारतीय संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे. पुरुष हॉकीमध्ये भारताने विक्रमी 16व्यांदा पदक जिंकले आहे. या 16 पदकांपैकी 4 सुवर्ण पदके आहेत. यजमान चीनला हरवून दक्षिण कोरियाने कांस्यपदक जिंकले. एकेकाळी महान हॉकी संघ असलेल्या पाकिस्तानला एकही पदक मिळाले नाही.
चीनमध्ये झालेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने पहिल्याच सामन्यापासून चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाचा या स्पर्धेत किती दबदबा होता, याचा अंदाज स्कोअरकार्डवरून लावता येईल. आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने उझबेकिस्तानचा 16-0 अशा मोठ्या फरकाने पराभव केला. यानंतर सिंगापूरचा 16-1 आणि बांगलादेशचा 12-0 असा पराभव झाला. भारताने गट फेरीतच जपानचा 4-2 आणि पाकिस्तानचा 10-10-2 असा पराभव केला होता. त्यानंतर अंतिम फेरीत जपानचा 5-1 असा पराभव केला. आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय पुरुष हॉकी संघाचे हे चौथे सुवर्णपदक आहे. याआधी 2014 मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने सुवर्ण यश मिळविले होते.
advertisement
मनप्रीतचा पहिला गोल
भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरमध्ये जपानविरुद्ध पहिला गोल केला. मनप्रीत सिंगने अप्रतिम खेळ दाखवत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. जपानने या गोलवर रिव्यू घेतला, पण त्याचा काही फायदा झाला नाही. मनप्रीत सिंगनंतर हरमनप्रीत सिंगने गोल केला. यासह भारताची आघाडी 2-0 अशी झाली.
advertisement
अमित रोहदास आणि अभिषेक यांचेही गोल
तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने पुन्हा गोल केला. यावेळी अमित रोहिदासने मैदानी गोल करत भारताला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली. काही वेळानंतर अभिषेकने भारतीय संघासाठी चौथा गोल केला. यासह भारतीय संघ 4-0 ने पुढे गेला. चार गोलने पिछाडीवर पडल्यानंतर जपानने एक गोल केला, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मात्र, 4-1 असा विजय भारतीय संघाला बहुधा मान्य नव्हता. टीम इंडियाने सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला गोल करत 5-1 असा विजय मिळवला.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games 2023: 9 वर्षांचा दुष्काळ संपला, भारतीय हॉकी संघाचं थेट सुवर्णयश, ऑलिम्पिकचा मार्ग मोकळा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement