Asian Games : एशियन गेम्समध्ये भारताचा सुवर्णपदकावर निशाणा, चीनचा विश्वविक्रमही मोडला
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल टीमने सुवर्णपदकावर निशाणा साधला. एश्वर्य प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश पवार यांनी सुवर्णपदक पटकावलं.
दिल्ली, 25 सप्टेंबर : एशियन गेम्स २०२३ मध्ये भारताच्या खात्यात यंदाच्या स्पर्धेतलं पहिलं सुवर्णपदक जमा झालं. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल टीमने सुवर्णपदकावर निशाणा साधला. एश्वर्य प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील, दिव्यांश पवार यांनी सुवर्णपदक पटकावलं. तिघांनी वैयक्तिक क्वालिफिकेशन राउंडमध्ये १८९३.७ गुण मिळवले. यासोबतच तिघांनी बाकू वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनने केलेला याआधीचा विश्वविक्रमही मोडला.
शूटिंगशिवाय रोइंगमध्येही आज भारताने एक पदक पटकावलं. रोइंगच्या मेन्स कॉक्सलेस फोर स्पर्धेत जसविंदर सिंह, आशिष, पुनीत कुमार आणि भीम सिंह यांनी कांस्य पदक पटकावलं. भारताने आतापर्यंत सात पदके जिंकली असून यात रोइंगमध्ये चार तर शूटिंगमध्ये तीन पदके मिळाली आहेत.
! - ⚡@RudrankkshP, @DivyanshSinghP7, and Aishwary Pratap Tomar have hit the bullseye and secured the 1️⃣st Gold for India in the 10m Air Rifle Men's Team event at the #AsianGames2022.… pic.twitter.com/wQbtEYX2CQ
— SAI Media (@Media_SAI) September 25, 2023
advertisement
रोइंगमध्ये भारताचा बलराज पवारचं मेडल थोडक्यात हुकलं. पुरुष एकेरीत स्कल्स फायनलमध्ये बलराज चौथ्या क्रमांकावर राहिला. चीनने या क्रीडा प्रकारात सुवर्ण, जपानने रौप्य आणि हाँगकाँगने कांस्य पदक पटकावलं.
चीनच्या हांगझोऊ इथं एशियन गेम्स स्पर्धा सुरू असून सोमवारी स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी भारताने पाच पदके पटकावली आहेत. आज दोन पदके पटकावली असून क्रिकेटमध्ये भारताच्या महिला संघाला सुवर्ण पदक जिंकण्याची संधी आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2023 8:28 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Asian Games : एशियन गेम्समध्ये भारताचा सुवर्णपदकावर निशाणा, चीनचा विश्वविक्रमही मोडला