इंग्लंडचे हिरो Asia Cup साठी झिरो, आगरकरच्या डोक्यात भलताच प्लॅन, कांगारूंची ट्रिक वापरणार!

Last Updated:

Team India selection for Asia Cup : यंदाचा आशिया कप T20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असल्यामुळे, निवड समिती T20 मॅचमधील खेळाडूंच्या कामगिरीला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.

Indian Cricket Team selection for Asia Cup 2025
Indian Cricket Team selection for Asia Cup 2025
Asia Cup 2025 Indian Cricket Team : इंग्लंड दौऱ्यात टीम इंडियाने अफलातून कामगिरी केली अन् मालिका बरोबरीत सोडवली. इंग्लंड दौऱ्यात 4 शतकांसह 750 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या शुभमन गिलने सर्वांना प्रभावित केले. त्याचप्रमाणे, मोहम्मद सिराजनेही आपल्या बॉलिंगने मॅचचा निकाल भारताच्या बाजूने वळवला होता. मात्र,इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मॅचमध्ये उत्कृष्ट कामगिरी करूनही शुभमन गिल आणि मोहम्मद सिराज यांना आगामी आशिया कपच्या संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे.

कसोटीतील कामगिरीचा विचार नाही

मात्र, यंदाचा आशिया कप T20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार असल्यामुळे, निवड समिती T20 मॅचमधील खेळाडूंच्या कामगिरीला प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे. यामुळे कसोटीतील कामगिरीचा विचार केला जाणार नाही. ऑस्ट्रेलिया ज्याप्रमाणे कसोटी आणि टी-ट्वेंटीसाठी वेगळी टीम निवडते, तसाच प्लॅन सिलेक्शन कमिटीने आखल्याचं पहायला मिळत आहे.

अभिषेक आणि संजूची जागा निश्चित

advertisement
ओपनिंगसाठी अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांची जागा निश्चित मानली जात आहे. तिसऱ्या ओपनरसाठी यशस्वी जैस्वालला संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शुभमन गिलचा मार्ग खडतर होऊ शकतो. मधल्या फळीत तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग यांना संधी दिली जाऊ शकते, तर ऑलराऊंडर म्हणून हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती क्रिकबझच्या रिपोर्टनुसार समोर आली आहे.
advertisement

जसप्रीत बुमराहला संधी, सिराज आऊट

पेस अटॅकबद्दल बोलायचे झाल्यास, जसप्रीत बुमराह त्याचे नेतृत्व करेल. बुमराहच्या पुनरागमनामुळे संघाला बळ मिळेल. मात्र, T20 फॉरमॅटचा विचार करता मोहम्मद सिराजच्या जागी हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळू शकते. प्रसिद्ध कृष्णाने अलीकडील आयपीएलमध्ये पर्पल कॅप जिंकली होती. भारतीय संघाची घोषणा 19 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे, त्यामुळे गिल आणि सिराजच्या भवितव्याबद्दल लवकरच चित्र स्पष्ट होईल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
इंग्लंडचे हिरो Asia Cup साठी झिरो, आगरकरच्या डोक्यात भलताच प्लॅन, कांगारूंची ट्रिक वापरणार!
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement