SRH फायनलमध्ये हरल्यावर तात्काळ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली काव्या मारन, पुढे जे झालं ते.... Video आला समोर

Last Updated:

कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा दारुण पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले. या पराभवानंतर काव्या मारन ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटण्यासाठी गेली सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

SRH फायनलमध्ये हरल्यावर तात्काळ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली काव्या मारन
SRH फायनलमध्ये हरल्यावर तात्काळ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली काव्या मारन
मुंबई : आयपीएल 2024 मध्ये रविवारी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात फायनलचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने हैदराबादचा दारुण पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले. हा पराभव जिव्हारी लागून हैदराबादची मालकीण काव्या मारन हिला अश्रू अनावर झाल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. या पराभवानंतर काव्या ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना भेटण्यासाठी गेली सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करून 20 ओव्हरमध्ये 10 विकेट्स गमावून केवळ 113 धावा केल्या ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 114 धावांचं सोपं आव्हान मिळालं होत. कोलकाता नाईट रायडर्सने हे आव्हान 8 विकेट्स आणि तब्बल 10 ओव्हर्स राखून पूर्ण केलं. ज्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा विजय झाला.
advertisement
संपूर्ण स्पर्धेत कमाल कामगिरी करून अनेक मोठे विक्रम रचणारी सनरायजर्स हैदराबादची टीम मात्र फायनल सामन्यात फ्लॉप ठरली. त्यांचा कोणताही फलंदाज मोठी कामगिरी करू शकला नाही तर दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांना देखील विकेट्स काढण्यात यश आले नाही, आणि परिणामी त्यांचा पराभव झाला. हा पराभव हैदराबादच्या टीमची मालकीण काव्या मारन हिच्या जिव्हारी लागला. स्टॅन्डमध्ये बसलेल्या काव्याला अश्रू अनावर झाले. तिचे हे अश्रू कॅमेऱ्याने टिपले. मात्र त्यानंतर अश्रू पुसत तिने विजयी झालेल्या केकेआरच्या संघासाठी उभं राहून टाळ्या वाजवत त्यांचे अभिनंदन केले.
advertisement
सामना संपल्यावर पॅट कमिन्स आणि डेनियल वेटोरी सोबत बोलल्यावर काव्या मारन हैदराबादच्या ड्रेसींग रूममध्ये पोहोचली. यावेळी सर्व खेळाडू उदास होते. तेव्हा काव्या मारन म्हणाली, "तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप गौरवांकित केलं आहे. मी फक्त तुम्हाला हे सांगण्यासाठी आली आहे की तुम्ही टी 20 खेळ कसा खेळावा याला रिडिफाइन केलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही संपूर्ण सिझन खेळला आहात त्यामुळे आज प्रत्येक जण तुमच्या बद्दल बोलत आहेत. आज आपला खराब दिवस होता परंतु तुम्ही सर्व खूप छान खेळलात. गेल्यावर्षी आपण पॉईंट टेबलमध्ये खूप खाली होती. पण तुम्ही या सीझनमध्ये जस परफॉर्म केलंत त्यामुळे फॅन्स मोठ्या संख्येने तुमचा खेळ बघायला येत होते. आज केकेआरने ही स्पर्धा जिंकली असली तरी लोक नक्कीच तुमच्या खेळाबद्दल चर्चा करत असणार.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
SRH फायनलमध्ये हरल्यावर तात्काळ ड्रेसिंग रूममध्ये पोहोचली काव्या मारन, पुढे जे झालं ते.... Video आला समोर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement