IPL 2025: रहाणेची उरली सूरलेली आशा संपली, प्लेऑफच्या तोंडावर दोन खेळाडूंनी सोडली साथ

Last Updated:

कोलकत्ता नाईट रायडर्सच्या अजिंक्य रहाणेला सर्वांत मोठा झटका बसला आहे. कारण प्लेऑफच्या तोंडावर आता दोन खेळाडूंनी आयपीएलमध्ये येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रहाणेला याचा मोठा फटका बसलाय.

ajinkya rahane story
ajinkya rahane story
IPL 2025 News : आयपीएल 2025 ला येत्या 17 मे 2025 पासून सूरूवात होत आहे. या दरम्यान मायदेशी परत गेलेल्या परदेशी खेळाडूंना बोलावण्यासाठी प्रत्येत संघ आटोकाट प्रयत्न करत आहेत. या सर्वांत कोलकत्ता नाईट रायडर्सच्या अजिंक्य रहाणेला सर्वांत मोठा झटका बसला आहे. कारण प्लेऑफच्या तोंडावर आता दोन खेळाडूंनी आयपीएलमध्ये येण्यास नकार दिला आहे. त्यामुळे रहाणेला याचा मोठा फटका बसलाय.
कोलकत्ता नाईट रायडर्सचा मोईन अली आणि रोवमन पॉवेल भारतात येऊ शकत नसल्याची माहिती आहे. वैद्यकीय कारणामुळे दोघेही आयपीएलच्या उर्वरीत सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहेत, अशी माहिती स्पोर्टस तकने दिली आहे.त्यामुळे अजिंक्य रहाणेचं टेन्शन वाढलं आहे. विशेष म्हणजे अद्याप रहाणे या दोन खेळाडूंची रिप्लेसमेंटही जाहीर केलेले नाही आहे.
आज 15 मे ला केकेआरचे सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ 17 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी बंगळुरूमध्ये पोहोचले होते. पण या खेळाडूंसोबत मोईन अली आणि रोवमन पॉवेल त्याच्यासोबत नसते. त्यामुळे रोवमनवर शस्त्रक्रिया सुरू आहे, तर मोईन आणि त्याचे कुटुंब विषाणूजन्य संसर्गाने ग्रस्त आहेत," असे एका सूत्राने स्पोर्ट्स तकला सांगितले आहे.
advertisement
अनुपलब्ध परदेशी खेळाडूंना बदलण्यासाठी आयपीएलने नियमात बदल केले आहेत. आयपीएल २०२५ एका आठवड्याच्या स्थगितीमुळे अनेक खेळाडू राष्ट्रीय प्रतिबद्धता, दुखापती किंवा वैयक्तिक कारणांमुळे उर्वरित स्पर्धेसाठी अनुपलब्ध आहेत. आयपीएलने या हंगामात तात्पुरत्या बदलीसाठी परवानगी दिली आहे. या कालावधीत निवडलेल्या खेळाडूंना पुढील वर्षीच्या लिलावासाठी नोंदणी करावी लागेल.पण अद्याप रहाणेने या पर्यायाचा अवलंब न केल्याची माहिती आहे.
advertisement
आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी, केकेआरला मोईन आणि पॉवेल यांच्या जागी खेळाडू शोधण्यास खूप उशीर झाला आहे. सध्या, क्विंटन डी कॉक, रहमानउल्लाह गुरबाज, सुनील नारायण, आंद्रे रसेल, अँरिच नॉर्टजे आणि स्पेन्सर जॉन्सन हे परदेशी खेळाडू उपलब्ध आहेत.
दरम्यान अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआर सध्या १२ सामन्यांतून ११ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. जरी त्यांनी चांगल्या फरकाने सामने जिंकले तरी त्यांची पात्रता इतर सामन्यांच्या निकालावर अवलंबून असेल.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025: रहाणेची उरली सूरलेली आशा संपली, प्लेऑफच्या तोंडावर दोन खेळाडूंनी सोडली साथ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement