IPL 2025 : लखनऊ-आरसीबी सामन्यात ड्रामा, विराटच्या कॅप्टनने टॉसनंतर टीम बदलली, आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचा सामना लखनऊविरुद्ध होत आहे. आरसीबीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण या मॅचमध्ये विजय मिळाला तर आरसीबी प्ले-ऑफसाठी टॉप-2 मध्ये येईल.
लखनऊ : आयपीएल 2025 मध्ये आरसीबीचा सामना लखनऊविरुद्ध होत आहे. आरसीबीसाठी हा सामना महत्त्वाचा आहे, कारण या मॅचमध्ये विजय मिळाला तर आरसीबी प्ले-ऑफसाठी टॉप-2 मध्ये येईल, पण पराभव झाला तर मात्र आरसीबीला एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सचा सामना करावा लागेल. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार जितेश शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
आरसीबीने त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले, त्यांचा नेहमीचा कर्णधार रजत पाटीदार दुखापतीमुळे इम्पॅक्ट सब म्हणून खेळणार आहे, तर जॉश हेजलवूडलाही दुखापतीनंतर संधी देण्यात आलेली नाही. आरसीबीने या महत्त्वाच्या सामन्यात टीम डेव्हिडऐवजी लियाम लिव्हिंगस्टोनला आणि लुंगी एनगिडीऐवजी नुवान तुषाराला संधी दिली. दुसरीकडे लखनऊनेही त्यांच्या टीममध्ये दोन बदल केले एडन मार्करमऐवजी मॅथ्यू ब्रीट्सकीला संधी मिळाली आहे, तर बंदीनंतर दिग्वेश राठीनेही कमबॅक केला आहे.
advertisement
टॉसवेळी ड्रामा
आरसीबी आणि लखनऊ यांच्यातल्या सामन्यात टॉसवेळी मोठा ड्रामा पाहायला मिळाला. कर्णधार जितेश शर्माने रजत पाटीदार इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल असं टॉसवेळी सांगितलं, पण जितेशने जेव्हा टीम शीट मॅच रेफ्रीकडे दिली तेव्हा रजत पाटीदार प्लेयिंग इलेव्हनमध्ये दाखवण्यात आला होता. जितेश शर्माने चुकून आरसीबीच्या पहिल्या बॅटिंगची शीट मॅच रेफ्रीकडे दिली, पण या सामन्यात आरसीबी पहिले बॉलिंग करत आहे. चूक लक्षात येताच आरसीबीने लगेचच मॅच रेफ्रीना बरोबर असलेली दुसरी शीट दिली, पण यासाठी त्यांना लखनऊ सुपरजाएंट्सची परवानगी घ्यावी लागली. मैदानामध्ये झालेल्या या गोंधळामुळे काही काळ कॉमेंटेटर्सही गोंधळले होते, पण त्यांनी पुढच्या काही मिनिटांमध्ये सगळा गोंधळ दूर केला.
advertisement
लखनऊची टीम
ऋषभ पंत, निकोलस पूरन, मिचेल मार्श, मॅथ्यू ब्रीट्सकी, आयुष बदोनी, अब्दुल समद, हिम्मत सिंग, शाहबाज अहमद, दिग्वेश राठी, आवेश खान, विलियम ओरुरक
इम्पॅक्ट सब
युवराज चौधरी, आर्शीन कुलकर्णी, आकाश सिंग, प्रिन्स यादव, रवी बिष्णोई
आरसीबीची टीम
फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाळ, नुवान तुषारा, सुयश शर्मा
advertisement
इम्पॅक्ट सब
टीम सायफर्ट, स्वप्निल सिंग, रजत पाटीदार, रसिक सलाम, मनोज भांडगे
Location :
Lucknow,Uttar Pradesh
First Published :
May 27, 2025 9:34 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2025 : लखनऊ-आरसीबी सामन्यात ड्रामा, विराटच्या कॅप्टनने टॉसनंतर टीम बदलली, आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!