काव्या मारनला कुणी ब्लॅकमेल केलं? IPL संपली पण राडा सुरूच, हैदराबादचे 6 जण ताब्यात
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
IPL free pass controversy SRH : आयपीएल 2025 दरम्यान सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता सहा जणांना ताब्यात घेण्यात आलंय.
Hyderabad Cricket Association : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 संपून एक महिना उलटला असला तरी, त्यासंबंधित एक मोठा वाद अजूनही चर्चेत आहे. आता या प्रकरणात एक मोठे वळण आले आहे. तेलंगणा सीआयडीने (CID) हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे (HCA) अध्यक्ष ए. जगन मोहन राव यांच्यासह पाच पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. आयपीएल 2025 दरम्यान सनरायझर्स हैदराबाद (SRH) फ्रँचायझीने केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. नेमका संपूर्ण वाद काय आहे? जाणून घ्या
कुणाकुणाला ताब्यात घेतलं?
ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये एचसीए अध्यक्ष ए. जगन मोहन राव यांच्या व्यतिरिक्त कोषाध्यक्ष सी. श्रीनिवास राव, सीईओ सुनील कांते, महासचिव राजेंद्र यादव आणि त्यांची पत्नी जी. कविता यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
यापूर्वी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी सनरायझर्स हैदराबादने केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या तक्रारीत एचसीए वारंवार 'ब्लॅकमेलिंग' करत असल्याचा आरोप करत क्रिकेट नियामक संस्थांच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली होती. दुसरीकडे, राज्य क्रिकेट युनिटने फ्रँचायझीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.
advertisement
3900 फ्री पासचे वाटप
वास्तविक, तीन महिन्यांपूर्वी सनरायझर्स हैदराबादने बीसीसीआय (BCCI) आणि आयसीसी (ICC) संचालन परिषदेकडे तक्रार केली होती की, हैदराबाद क्रिकेट असोसिएशन वारंवार अतिरिक्त फ्री पाससाठी त्यांना ब्लॅकमेल करत आहे. असेच सुरू राहिल्यास त्यांना आपले होम मॅच (घरचे सामने) इतर राज्यात हलवावे लागतील, अशी धमकीही फ्रँचायझीने दिली होती. त्यानंतर सनरायझर्स हैदराबाद आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशन यांच्यात झालेल्या बैठकीत 3900 फ्री पासचे वाटप सुरू ठेवण्यावर सहमती झाली होती. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, येत्या काळात यात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
Location :
Hyderabad,Telangana
First Published :
July 10, 2025 12:09 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
काव्या मारनला कुणी ब्लॅकमेल केलं? IPL संपली पण राडा सुरूच, हैदराबादचे 6 जण ताब्यात