IND vs ENG : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये 'या' खेळाडूची अरेरावी? खेळायचं की नाही, स्वत:च घेतोय निर्णय
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Jasprit Bumrah arbitrary rule : बुमराहने तीनच कसोटी खेळण्याच्या मुद्द्यावरून पाचव्या आणि निर्णायक कसोटीत खेळण्यास नकार दिल्याने भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) पदाधिकारी नाराज झाले आहेत.
India vs England Test Series : यजमान इंग्लंड आणि पाहुण्या टीम इंडियामध्ये पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेमध्ये अखेरचा सामना ओव्हलच्या मैदानात खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठे बदल केले गेले. मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासमोर मोठं आव्हान असताना काही स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर आहेत. अशातच आता टीम इंडियाच्या एका खेळाडूची ड्रेसिंग रुममध्ये मनामानी कारभार सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून जसप्रीत बुमराह आहे.
BCCI चे पदाधिकारी नाराज
मिळालेल्या माहितीनुसार, बुमराहने तीनच कसोटी खेळण्याच्या मुद्द्यावरून पाचव्या आणि निर्णायक कसोटीत खेळण्यास नकार दिल्याने भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यामुळे आता बुमराह संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध असेल तरच त्याची निवड करायची, असे धोरण अमलात आणण्याचा निर्णय बोर्डाने घेतला असल्याचे समजते.
बुमराहचा निर्णय कोण घेतंय?
advertisement
स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक (Strength and Conditioning Coach) प्रत्येक खेळाडू किती भार वाहू शकतो हे ठरवतात. बुमराहच्या उपलब्धतेचा निर्णय वैद्यकिय समिती घेत असते. मात्र, बुमराह कोणता सामना खेळायचा आणि कोणता नाही याचा निर्णय घेत असल्याने टीका होताना दिसत आहे. बुमराह टीम इंडियाच्या निर्णयाविरोधात जाऊन निर्णय घेतोय का? असा सवाल देखील विचारला जात आहे. तसेच हेड कोच आणि कॅप्टनचे निर्णय देखील डावलले जातायेत का? अशी चर्चा देखील होताना दिसत आहे.
advertisement
पाचव्या कसोटीत न खेळण्याचा निर्णय
मालिकेतील पहिली कसोटी भारताने गमावल्यानंतरही, दुसऱ्या कसोटीसाठी त्याला विश्रांती देण्यास संघ व्यवस्थापनाला भाग पडले होते. त्यानंतर तो सलग दोन कसोटी खेळला. मात्र, चौथ्या कसोटीत त्याला पायात गोळे आले आणि किरकोळ दुखापतही झाली होती. याच कारणामुळे त्याने पाचव्या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जसप्रीत बुमराह केवळ तीनच कसोटी खेळणार असल्याने भारतीय संघाची डोकेदुखी वाढली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 02, 2025 10:27 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs ENG : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये 'या' खेळाडूची अरेरावी? खेळायचं की नाही, स्वत:च घेतोय निर्णय


