'जमत नव्हतं तर IPL सोडायचं...', द्रविड-गांगुलीला बाहेर काढणाऱ्या दिग्गजाचा बुमराहवर थेट हल्ला

Last Updated:

जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड वरून सुरू असलेला वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये. इंग्लंड सीरिजमध्ये खेळण्यासाठी बुमराहने आयपीएल 2025 मधून माघार घ्यायला पाहिजे होती, असं वक्तव्य दिग्गज क्रिकेटपटूने केलं आहे.

'जमत नव्हतं तर IPL सोडायचं...', द्रविड-गांगुलीला बाहेर काढणाऱ्या दिग्गजाचा बुमराहवर थेट हल्ला
'जमत नव्हतं तर IPL सोडायचं...', द्रविड-गांगुलीला बाहेर काढणाऱ्या दिग्गजाचा बुमराहवर थेट हल्ला
मुंबई : जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड वरून सुरू असलेला वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये. भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी तर बुमराहवर थेट निशाणा साधला आहे. आयपीएल 2025 मध्ये खेळला नसतास तर इंग्लंड दौऱ्यामधल्या सगळ्या 5 टेस्टमध्ये खेळता आलं असतं, असं दिलीप वेंगसरकर म्हणाले आहेत. इंग्लंड सीरिजच्या आधीपासूनच टीम व्यवस्थापन आणि बीसीसीआयने बुमराह सीरिजच्या 3 टेस्ट खेळेल, हे आधीच स्पष्ट केलं होतं.

काय म्हणाले वेंगसरकर?

'आयपीएलमध्ये केलेले रन आणि विकेट कुणाच्या लक्षात राहतात? पण चाहत्यांना भारत-इंग्लंड सीरिजमधील मोहम्मद सिराजची उत्कृष्ट कामगिरी, शुभमन गिल, केएल राहुल, यशस्वी जयस्वाल आणि ऋषभ पंत यांनी केलेल्या रन आणि वॉशिंग्टन सुंदरची ऑलराऊंड कामगिरी लक्षात राहिल', असं वेंगसरकर म्हणाले.
भारताकडून 116 टेस्ट मॅच खेळलेले दिलीप वेंगसरकर हे 2006-2008 दरम्यान टीम इंडियाचे निवड समिती प्रमुख होते. निवड समिती प्रमुख असताना दिलीप वेंगसरकर यांनी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या दिग्गज खेळाडूंना वनडे क्रिकेटमधून बाहेर केलं. तसंच वेंगसरकर निवड समिती प्रमुख असताना भारताने टी-20 वर्ल्ड कपही जिंकला. दिलीप वेंगसरकर यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये बुमराहबद्दल कठोर शब्द वापरले आहेत.
advertisement
'भारत-इंग्लंड सीरिजचं महत्त्व आणि बुमराहच्या पाठीची दुखापत पाहता, बीसीसीआय, निवड समिती आणि भारतीय टीम मॅनेजमेंटने त्याला आयपीएल 2025 मध्ये विश्रांती द्यायला पाहिजे होती. बुमराह आयपीएल खेळला नसता तर भारत-इंग्लंड सीरिजसाठी पूर्णपणे फिट झाला असता. जर मी निवड समिती प्रमुख असतो तर मुंबई इंडियन्स आणि बुमराहला समजवलं असतं, की इंग्लंड सीरिजसाठी बुमराहचं आयपीएल न खेळणं किती गरजेचं आहे. मला विश्वास आहे, त्यांनी माझं हे म्हणणं ऐकलं असतं', असं वक्तव्य वेंगसरकर यांनी केलं आहे.
advertisement
'अशा प्रकारची सीरिज 4 वर्षांमधून एकदा होते. टीम इंडिया जानेवारी 2027 पर्यंत (ऑस्ट्रेलियाविरुद्ध) पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणार नाही. ही कायम लक्षात राहील अशी सीरिज होती. बुमराह सगळ्या मॅच खेळला असता, तर भारत कदाचित सीरिजही जिंकू शकला असता', असंही वेंगसरकर म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'जमत नव्हतं तर IPL सोडायचं...', द्रविड-गांगुलीला बाहेर काढणाऱ्या दिग्गजाचा बुमराहवर थेट हल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement