KKR vs RR : 3 सामने उरले,एक जिंकली तरी केकेआरला मिळणार प्लेऑफच तिकीट,जाणून घ्या फायनल समीकरण
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कोलकत्ता नाईट रायडर्सचे 11 सामन्यात 11 गुण झाले असून आता ते सहाव्या स्थानी पोहोचले आहे. आता रहाणेच्या या संघाला उरलेले तीन सामने जिंकायचे आहेत. यामधला एक सामना जिंकला तर कोलकत्ता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये पोहोचणार आहे.
KKR Playoff Scenario IPL 2025 : आयपीएलमध्ये आज अटीतटीच्या सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सने अवघ्या एका रनने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे.या विजयानंतर कोलकत्ता नाईट रायडर्सचे 11 सामन्यात 11 गुण झाले असून आता ते सहाव्या स्थानी पोहोचले आहे. आता रहाणेच्या या संघाला उरलेले तीन सामने जिंकायचे आहेत. यामधला एक सामना जिंकला तर कोलकत्ता नाईट रायडर्स प्लेऑफमध्ये पोहोचणार आहे. त्यामुळे शाहरूख खानच्या टीमचं प्लेऑफमध्ये पोहोचण्याच समीकरण कसं असणार आहे? हे जाणून घेऊयात.
आयपीएलमध्ये आता कोलकत्ता नाईट रायडर्सचे फक्त 3 सामने उरले आहेत. यामध्ये कोलकत्ताचे सामने हे चेन्नई सुपर किंग्ज,सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरुसोबत पार पडणार आहेत. यामधील चेन्नई सुपर किंग्ज,सनरायझर्स हैदराबाद संघ प्लेऑफमधून बाहेर झाले आहेत, कारण या दोन्ही संघाची कामगिरी यंदाच्या सीझनमध्ये चांगली राहिली नाही. त्यामुळे या दोन संघांना कोलकत्ता सहज पराभूत करू शकते अशी अशा आहे.हे दोन सामने जिंकल्यानंतर कोलकत्तासाठी खरं आव्हान आरसीबीचं आहे.
advertisement
आरसीबी सध्या पॉईंट्स टेबसलमध्ये पहिल्या स्थानावर आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीमही ठरली आहे. त्यामुळे या संघाला पराभूत करणे कोलकत्तासाठी आव्हानात्मक असणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकला की कोलकत्ताचं प्लेऑफच तिकीट कन्फर्म होणार आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन):
यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, रियान पराग (कर्णधार), कुणाल सिंग राठोड, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), शिमरोन हेटमायर, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, युद्धवीर सिंग चरक, आकाश मधवाल
advertisement
कोलकाता नाईट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन) :
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, मोईन अली, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 04, 2025 7:46 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
KKR vs RR : 3 सामने उरले,एक जिंकली तरी केकेआरला मिळणार प्लेऑफच तिकीट,जाणून घ्या फायनल समीकरण