IND vs PAK : मोहम्मद युसूफने सगळ्या मर्यादा ओलांडल्या, सूर्याची माफी मागण्याऐवजी सोशल मीडियावर ओकली गरळ!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mohammad Yousuf vs Suryakumar Yadav : वाढता वाद पाहून युसूफने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्याने स्पष्टपणे सूर्यकुमारचे नाव घेतलं नाही.
Mohammad Yousuf abuses Suryakumar Yadav : एशिया कपमध्ये (Asia Cup) भारताने पाकिस्तानचा (Pakistan) पराभव केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे. आता काही माजी पाकिस्तानी खेळाडू या वादात आणखी भर घालत आहेत. यातच पाकिस्तानचा माजी खेळाडू मोहम्मद युसूफने एक धक्कादायक विधान केले आहे. त्याने भारतीय संघाचा टी- ट्वेंटी कर्णधार सूर्यकुमार यादवला थेट लाइव्ह टीव्हीवर 'डुक्कर' (Pig) म्हटलं आहे. नंतर त्याने सोशल मीडियावर एक विचित्र पोस्ट टाकून यावर स्पष्टीकरण दिलं आणि पुन्हा गरळ ओकली.
जो खेळाडू आपल्या देशासाठी.... - मोहम्मद युसूफ
रविवारी झालेल्या एशिया कपच्या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर मोहम्मद युसूफवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. त्याचे हे विधान अत्यंत खालच्या पातळीचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं. वाढता वाद पाहून युसूफने सोशल मीडियावर एक पोस्ट केली. यात त्याने स्पष्टपणे सूर्यकुमारचे नाव घेतलं नाही. परंतु, ‘जो खेळाडू आपल्या देशासाठी आवड आणि सन्मानाने खेळतो, त्याच्याबद्दल अनादर व्यक्त करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता,’ असं स्पष्टीकरण त्यानं दिलं आहे. त्यानंतर युसूफ याने पुन्हा आपला जुन्हा रेटा ओढला.
advertisement
I didn’t mean any disrespect to any sportsman who plays for his country with passion and grace, but why were the Indian media and people praising Irfan Pathan when he said that Shahid Khan Afridi was barking like a dog? Shouldn’t that have been rejected by everyone who talks…
— Mohammad Yousaf (@yousaf1788) September 16, 2025
advertisement
शाहिद खान आफ्रिदी कुत्र्यासारखा...
अनादर व्यक्त करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता पण जेव्हा शाहिद खान आफ्रिदी कुत्र्यासारखा भुंकत आहे, असं इरफान पठाण म्हणाला तेव्हा भारतीय मीडिया आणि लोक त्याचं कौतुक का करत होते? सन्मान आणि आदराबद्दल बोलणाऱ्या प्रत्येकाने ते नाकारायला नको होते का? असा सवाल युसूफ याने सोशल मीडियावर विचारला आहे.
advertisement
टीम इंडियावर फसवणूक केल्याचा आरोप केला
दरम्यान, एका टीव्ही शो दरम्यान युसुफने सूर्यकुमार यादवला 'सुवरकुमार यादव' असं म्हटलं. त्याने सूर्यकुमारचा 'सुवर' म्हणजेच 'डुक्कर' असा उल्लेख केला. यानंतर, त्यांनी टीम इंडियावर फसवणूक केल्याचा आरोप केला आणि म्हटले की, 'टीम इंडिया ज्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करत आहे त्याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं युसूफ लाईट टीव्हीच्या डिबेट शोमध्ये बोलताना दिसतोय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 17, 2025 7:54 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : मोहम्मद युसूफने सगळ्या मर्यादा ओलांडल्या, सूर्याची माफी मागण्याऐवजी सोशल मीडियावर ओकली गरळ!