Mohsin Naqvi : '10 नोव्हेंबरला दुबईत मी स्वत:...', आशिया कपच्या ट्रॉफीवर मोहसीन नक्वी म्हणाले, 'तुमच्या कॅप्टनला घेऊन...'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Mohsin Naqvi Ask to Collect Asia Cup trophy : मोहसीन नक्वी यांनी कराचीमध्ये पत्रकारांना माहिती दिली. नक्वी म्हणाले, BCCI सोबत आशिया कपच्या ट्रॉफीबाबत अनेक पत्रव्यवहार झाले आहेत.
Asia Cup 2025 Trophy Controversy : आशिया क्रिकेट कॉन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी टीम इंडियाला आशिया कपची ट्रॉफी देण्यासाठी दुबईमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. बीसीसीआय (BCCI) आणि एसीसी (ACC) यांच्यातील पत्रव्यवहारानंतर 10 नोव्हेंबरला हा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. पण मोहसीन नक्वी यांनी पुन्हा गुर्मी दाखवल्याने मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
10 नोव्हेंबरला दुबईमध्ये....
या संदर्भात मोहसीन नक्वी यांनी कराचीमध्ये पत्रकारांना माहिती दिली. नक्वी म्हणाले, BCCI सोबत अनेक पत्रव्यवहार झाले. आशिया क्रिकेट कॉन्सिलने त्यांना कळवलं आहे की, 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये होणाऱ्या समारंभात आम्ही भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव आणि त्याच्या खेळाडूंसह बीसीसीआयचे अधिकारी राजीव शुक्ला यांना ट्रॉफी देण्यासाठी तयार आहोत, असं नक्वी म्हणाले. पण यावेळी त्यांनी आपला हट्ट सोडला नाही.
advertisement
माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारा - मोहसीन नक्वी
नक्वी पुढे म्हणाले की, आशिया क्रिकेट कॉन्सिलने BCCI ला लिहिलं आहे की, 10 नोव्हेंबरला दुबईमध्ये एक समारंभ आयोजित केला जाऊ शकतो. तुमचा कॅप्टन आणि खेळाडूंना घेऊन या आणि माझ्याकडून ट्रॉफी स्वीकारा, असं म्हणत नक्वीने माज दाखवला आहे. त्यामुळे मोहसीन नक्वी यांना ट्रॉफी द्यायची की नाही? असा सवाल विचारला जात आहे.
advertisement
Mohsin Naqvi-instructed letter by Asian Cricket Council to BCCI: Asia Cup Trophy rightfully belongs to India but will only be handed over to a Player and an Official in a ceremony with ‘fanfare and (media) coverage’.
Needless to say, India need to take this to the ICC Board now.
— Vikrant Gupta (@vikrantgupta73) October 21, 2025
advertisement
स्टेडियममधून ट्रॉफी हटवण्याचे निर्देश
दरम्यान, टीम इंडियाने 28 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा फायनल सामना जिंकल्यानंतर नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारली नव्हती. जवळपास एका तासाच्या वादानंतर नक्वी यांनी स्टेडियममधून ट्रॉफी हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर नक्वी यांनी आयसीसीच्या मुख्यालयात ट्रॉफी ठेवली अन् आपल्या आदेशाशिवाय ट्रॉफी द्यायची नाही, असा आदेश देखील दिला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2025 7:30 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mohsin Naqvi : '10 नोव्हेंबरला दुबईत मी स्वत:...', आशिया कपच्या ट्रॉफीवर मोहसीन नक्वी म्हणाले, 'तुमच्या कॅप्टनला घेऊन...'