CSKची सूत्रे पुन्हा धोनीच्या हातात, ऋतुराजला झाले तरी काय? दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नई कर्णधार बदलणार

Last Updated:

CSK vs DC IPL 2025: चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स मॅचमध्ये ऋतुराज गायकवाडच्या अनुपस्थितीत एमएस धोनी कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.

News18
News18
चेन्नई: IPLमध्ये उद्या शनिवारी डबल हेडरमधील पहिली मॅच चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. आतापर्यंत झालेल्या सामन्यात चेन्नईने 3 पैकी 2 लढती गमावल्या आहेत. तर दिल्लीने 2 पैकी 2 मध्ये विजय मिळवला आहे. चेन्नईसाठी प्लेऑफच्या दृष्टीने उद्याची लढत महत्त्वाची आहे. अशात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्लीविरुद्ध होणाऱ्या लढतीत चेन्नई संघावर कर्णधार बदलण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. या लढतीत ऋतुराज गायकवाड ऐवजी कर्णधारपद महेंद्र सिंह धोनीकडे येणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.
चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड शनिवारच्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याचे समजते. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करू शकतो, असे वृत्त द इंडियन एक्सप्रेस दिले आहे. चेन्नईकडे कर्णधारपदासाठी दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे धोनीसाठी पुन्हा एकदा कर्णधार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
एमएस धोनीने यापूर्वी 2023 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व केले होते. ज्यामध्ये त्यांनी गुजरात टायटन्सला हरवून संघाला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून दिले होते.
advertisement
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान तुषार देशपांडेच्या चेंडूने गायकवाडच्या हाताच्या पुढच्या भागाला (forearm) दुखापत झाली होती. दुखापत होऊनही त्याने फलंदाजी करणे सुरू ठेवले. परंतु त्यानंतर तो सरावासाठी उतरलेला नाही. सीएसकेचे फलंदाजी प्रशिक्षक डेव्हिड हसी यांनी सांगितले की, त्याच्या नेटमधील सत्रानंतर  खेळण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना हसी म्हणाले, होय, आम्हाला आशा आहे की तो सरावासाठी फलंदाजीचा प्रयत्न करेल. मात्र त्याला अजूनही थोडा त्रास होत आहे. आम्हाला खूप आशा आहे आणि विश्वास आहे की तो उद्या (शनिवारी) ठीक होईल.
advertisement
गायकवाडच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व कोण करेल, असे विचारले असता हसी म्हणाले की, त्यांनी याबद्दल जास्त विचार केला नाही. पण त्यांनी धोनीच्या नावाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख केला. मला खात्री आहे की मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग आणि ऋतुराजने त्याबद्दल विचार केला असेल.
धोनीने 2023 च्या हंगामानंतर कर्णधारपद सोडले होते. मात्र अनेकदा त्याच्या सामन्यांमधील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत. हंगामापूर्वी त्याने हे स्पष्ट केले होते की, त्याच्याकडून गायकवाडकडे कर्णधारपदाचे हस्तांतरण पूर्ण झाले आहे. मैदानावर बहुतेक निर्णय ऋतुराजच घेतो.
advertisement
चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे आणि ते दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहेत. दिल्लीने पहिले दोन सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाड जर शनिवारच्या सामन्यात खेळू शकला नाही. तर अनुभवी एमएस धोनी पुन्हा एकदा सीएसकेच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दिसेल.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
CSKची सूत्रे पुन्हा धोनीच्या हातात, ऋतुराजला झाले तरी काय? दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नई कर्णधार बदलणार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement