advertisement

RCB vs MI : आरसीबीला हरवलं पण Mumbai Indians फायनलमध्ये पोहोचणार नाही? जाणून घ्या एलिमिनेटरचं समीकरण!

Last Updated:

WPL 2026 Eliminator Scenario : आरसीबीसाठी मुंबईविरुद्धचा निकाल धक्कादायक ठरला कारण सलग 5 विजय मिळवल्यानंतर त्यांना आता सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.

WPL 2026  Eliminator Scenario, Mumbai Indians
WPL 2026 Eliminator Scenario, Mumbai Indians
Mumbai Indians WPL Final : विमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या शेवटाची आता सुरूवात झाली आहे. विमेन्स प्रीमियर लीगच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी मोठी चुरशीची लढाई पहायला मिळत आहे. अशातच स्पर्धेतील 16 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला 15 रनने पराभूत करत सर्वांना चकित केलं आहे. त्यामुळे आरसीबीला सलग दोन सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. अशातच आता मुंबई इंडियन्सला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसाठी प्लेऑफचं दार अजूनही बंद झालं नाही.

सलग दुसरा पराभव

विमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या रंगतदार टप्प्यात आता मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आरसीबीसाठी हा निकाल धक्कादायक ठरला कारण सलग 5 विजय मिळवल्यानंतर त्यांना आता सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतरही आरसीबीचे गुणतालिकेतील स्थान सध्या तरी सुरक्षित असल्याचे दिसत आहे. आरसीबी थेट फायनलमध्ये जाऊ शकते. तर मुंबई, दिल्ली आणि गुजरात या तीन संघात एलिमिनेटरसाठी फाईट पहायला मिळेल.
advertisement

टॉप 2 मध्ये झेप 

मुंबई इंडियन्सने या मॅचमध्ये मिळवलेला विजय त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. सलग 3 पराभव पत्करल्यानंतर सातव्या मॅचमध्ये मुंबईने आपला तिसरा विजय नोंदवला आहे. या विजयामुळे मुंबईने थेट खालच्या क्रमांकावरून टॉप 2 मध्ये झेप घेतली आहे. मुंबईचा नेट रनरेट आता इतर टीम्सच्या तुलनेत सुधारला असून त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. सध्या मुंबई, दिल्ली आणि गुजरात या तिन्ही टीम्सचे 6-6 पॉइंट्स झाले आहेत.
advertisement

मुंबईला एलिमिनेटर खेळायची असेल तर...

दरम्यान, आता मुंबई इंडियन्सला जर एलिमिनेटर खेळायंच असेल तर अखेरचा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. जर अखेरच्या सामन्यात मुंबई हरली तर थेट बाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे. पण मुंबईला एलिमिनेटर खेळायची असेल तर गुजरात आणि दिल्लीला आगामी सामना गमवावा लागणार आहे. त्यामुळे आता मुंबईच समीकरण अधिक रोमांचक झालं आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB vs MI : आरसीबीला हरवलं पण Mumbai Indians फायनलमध्ये पोहोचणार नाही? जाणून घ्या एलिमिनेटरचं समीकरण!
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement