Mumbai Indians VIDEO : मुंबईचा पैसा वसूल, 3 कोटीच्या खेळाडूने मैदानात राडा केला, 313 च्या स्ट्राईक रेटने धावा
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
आयपीएल 2026चा हंगाम सूरू व्हायला अजून दोन महिने उरले आहेत.त्याआधी मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू चमकला आहे. या खेळाडूने मैदानात वादळी खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने 6 सिक्स मारले आहे.
Mumbai Indians News : आयपीएल 2026चा हंगाम सूरू व्हायला अजून दोन महिने उरले आहेत.त्याआधी मुंबई इंडियन्सचा एक खेळाडू चमकला आहे. या खेळाडूने मैदानात वादळी खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने 6 सिक्स मारले आहे. विशेष म्हणजे त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूंना फोडून काढलं आहे. कारण या खेळी दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 313 होता.
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी शेफर्न रुदरफोर्ड आहे. रुदरफोर्ड हा यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळणार आहे. त्याला डिसेंबरमध्ये पार पडलेल्या ट्रेडमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ताफ्यात घेतलं होते. विशेष म्हणजे त्याला तब्बल 2.60 कोटीच्या किमतीत ताफ्यात घेतलं होतं. आज त्याची ही कामगिरी पाहून मुंबई इंडियन्सचा पैसा वसूल झाला आहे.
advertisement
Rutherford - 47* (15).
Brevis - 36* (13).
Pretoria Capitals after 17 overs - 148/5.
Pretoria Capitals after 20 overs - 220/5.
PC scored 72 runs in the last 3 overs. 🤯
pic.twitter.com/XoZlsENNw4
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 31, 2025
advertisement
खरं शेफरन रुदरफोर्ड सध्या साऊथ आफ्रिेकेच्या टी20 लीगमध्ये खेळतो आहे. या लीगमध्ये तो प्रिटोरीया कॅपिटल्स संघातून खेळतो आहे. या संघाचा आज एमआय केप टाऊन विरूद्ध सामना पार पडला. या सामन्यात शेफरन रुदरफोर्ड 15 बॉलमध्ये 47 धावांची नाबाद खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने सहा षटकार मारले होते. विशेष म्हणजे या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 313 होता.
advertisement
शेफरन रुदरफोर्ड सोबत शेवटच्या बेबी एबी डेवाल्ड ब्रेविसने 13 बॉलमध्य़े 36 धावांची खेळी केली होती.तसेच शाय होपच्या 45 धावा आणि विहान लुबेच्या 60 धावा केल्या होत्या. त्यामुळे या बळावर प्रिटोरीया कॅपिटल्सने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 220 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे आता एमआय केपटाऊन समोर 221 धावांचे आव्हान आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 11:36 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians VIDEO : मुंबईचा पैसा वसूल, 3 कोटीच्या खेळाडूने मैदानात राडा केला, 313 च्या स्ट्राईक रेटने धावा











