Rohit Sharma च्या कुरापतीमागे गौतम गंभीर? उतरलेला चेहरा अन् LIVE कार्यक्रमात हिटमॅन खूप काही बोलून गेला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Rohit Sharma Gautam Gambhir Controversy : रोहित शर्माने गौतम गंभीरला नाही तर राहुल द्रविडला क्रेडिट दिलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय.
Rohit Sharma On Rahul Dravid Era : आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी रोहित शर्माला टीम इंडियाच्या कॅप्टन्सीवरून डावलण्यात आलं आहे. अशातच 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माला विशेष स्मृतिचिन्ह देण्यात आलं. त्याने या विजयाचं श्रेय प्रशिक्षक गौतम गंभीरला नाही तर राहुल द्रविडला दिलं. रोहितच्या विधानानंतर, नेटकरी याला हिटमॅनला जबरदस्तीने एकदिवसीय कर्णधारपदावरून काढून टाकण्याशी जोडत आहेत.
हार मानली नाही आणि एकत्र काम केलं
टीम इंडियाच्या अलिकडच्या विजयांचे श्रेय केवळ त्यालाच नाही तर संघाच्या कठोर परिश्रम आणि विचारसरणीला जाते, जे राहुल द्रविडच्या काळापासून आहे. 2023 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात पराभव झाल्यानंतर, संघाने हार मानली नाही आणि एकत्र काम केले, ज्यामुळे 2024 च्या टी-20 विश्वचषक आणि 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजय मिळवला, असं रोहित शर्मा म्हणाला. रोहित शर्माच्या या वक्तव्यानंतर रोहित शर्माने गौतम गंभीरला नाही तर राहुल द्रविडला क्रेडिट दिलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
THE HITMAN ROHIT SHARMA TALKS ABOUT ON HIS EMOTIONAL PERIOD IN INDIAN CRICKET.
pic.twitter.com/LizId6KuzP
— MANU. (@IMManu_18) October 8, 2025
अनुभव खूप छान होता - रोहित
मला तो संघ खूप आवडतो. त्यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव खूप छान होता. तो फक्त एक-दोन वर्षांचा नव्हता, तर तो अनेक वर्षांचा प्रवास होता. आम्ही अनेक वेळा ट्रॉफी जिंकण्याच्या अगदी जवळ पोहोचलो होतो, पण पूर्ण करू शकलो नाही. मग सर्वांनी ठरवले की आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे, असंही रोहित शर्मा म्हणाला आहे.
advertisement
प्लॅन अंमलात आणले पाहिजे - रोहित शर्मा
फक्त विचार करून काहीही होत नाही. ते अंमलात आणले पाहिजे. हे फक्त एक किंवा दोन खेळाडू करू शकत नाहीत, संपूर्ण संघाला त्या विचारात सहभागी करून घेतलं पाहिजे. चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक खेळाडूने ही कल्पना स्वीकारली. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या सर्व खेळाडूंनी सामने कसे जिंकायचे, स्वतःला कसे आव्हान द्यायचे आणि काहीही गृहीत कसे धरायचे याचा विचार केला होता, असं रोहित शर्माने म्हटलं आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 10:52 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma च्या कुरापतीमागे गौतम गंभीर? उतरलेला चेहरा अन् LIVE कार्यक्रमात हिटमॅन खूप काही बोलून गेला!