IND vs SA 1st ODI : विराट कोहली नाही तर 'या' दोन खेळाडूंना KL Rahul ने दिलं विजयाचं क्रेडिट! धोनीची स्टाईल वापरली
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Indian Captain KL Rahul Statement : रोहित आणि कोहली यांच्या शानदार खेळाबद्दल बोलताना राहुल भावूक झाला. तो म्हणाला, दोघांना अशाप्रकारे फ्रीडमने खेळताना पाहणे नेहमीच मजेदार असतं.
KL Rahul On IND vs SA 1st ODI : टीम इंडिया आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला वनडे सामना खेळवला गेला. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने रोमांचक विजय मिळला आहे. अशातच पोस्ट मॅच प्रेझेन्टेशनमध्ये केएल राहुलने मोठं वक्तव्य केलं. मी जर म्हटले की अजिबात धडधड झाली नाही, तर ते खोटे ठरेल. मला वाटते की संपूर्ण 50 ओव्हरमध्ये मी थोडा नर्व्हस होतो. मी बराच काळानंतर वनडे खेळत होतो आणि पुन्हा देशाचे नेतृत्व करत होतो, त्यामुळे माझ्याकडून आणि ज्यांनी मला ही जबाबदारी दिली आहे त्यांच्याकडून थोडी अपेक्षा होती, असं केएल राहुलने म्हटलं आहे.
आमचा प्लॅन्स खूप क्लीअर होता...
हो, थोडी नक्की धडधड वाटत होती, पण मला वाटते की आम्ही योग्य वेळी विकेट्स घेत राहिलो आणि आमचा प्लॅन्स खूप क्लीअर आणि अवघड होता. बॉलर्सने प्लॅनिंगनुसार काम केलं. संपूर्ण मॅचमध्ये शांतता होती, पण प्रतिस्पर्धकांनी प्रेशर टाकले आणि ते जोरदार खेळत राहिले, त्यामुळे एक्साइटिंग वाटलं, असं केएल राहुल म्हणाला.
advertisement
विराट अन् रोहितसाठी आनंदी
रोहित आणि कोहली यांच्या शानदार खेळाबद्दल बोलताना राहुल भावूक झाला. तो म्हणाला, दोघांना अशाप्रकारे फ्रीडमने खेळताना पाहणे नेहमीच मजेदार असते. त्यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये हेच केलं आहे आणि प्रतिस्पर्धकांना प्रेशरखाली ठेवलं आहे. ते कोण आहेत आणि त्यांनी देशासाठी किती गेम्स जिंकले आहेत, हे जगाला दाखवून देतात. मी हे खूप दिवसांपासून पाहत आलो आहे आणि आता ड्रेसिंग रूममध्ये त्यांना पाहणं, त्यांच्यासोबत गप्पा मारणं खूप मजेदार आहे. त्यांना अशाप्रकारे खेळताना पाहणे माझ्यासाठी आणि स्टेडियममधील प्रत्येकासाठी आनंददायी असल्याचं केएल राहुलने म्हटलं आहे.
advertisement
तो अजूनही शिकतोय...
यावेळी केएल राहुलने दोन खेळाडूंचं खास कौतूक केलं. युवा बॉलर हर्षित राणा आणि अनुभवी कुलदीप यादव यांच्या कामगिरीबद्दल राहुलने कौतुक केलं. हर्षितमध्ये क्षमता आहे हे आम्हाला माहीत होते आणि तो एक खास खेळाडू आहे. तो उंच आहे, वेगाने बॉलिंग करतो आणि त्याला टीम इंडिया अजूनही शोधत आहे. तो अजूनही शिकत आहे, पण त्याच्यामध्ये मोठी क्षमता दिसत आहे, असं केएल म्हणाला.
advertisement
मधल्या ओव्हरमध्ये विकेट्स
दरम्यान, ऑस्ट्रेलियातही त्याने उत्कृष्ट बॉलिंग केली आणि इथे नवीन बॉल घेऊन महत्त्वपूर्ण विकेट्स घेणं, हेच आम्हाला त्याच्याकडून अपेक्षित आहे, असं केएल राहुल म्हणाला. कुलदीप अनेक वर्षांपासून आपलं काम करत आहे आणि मधल्या ओव्हरमध्ये विकेट्स मिळवण्यासाठी तो आमच्यासाठी महत्त्वाचा ठरला. या दोन खेळाडूंमुळे मॅच जिंकू शकलो, असं केएल राहुल म्हणाला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 01, 2025 8:36 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs SA 1st ODI : विराट कोहली नाही तर 'या' दोन खेळाडूंना KL Rahul ने दिलं विजयाचं क्रेडिट! धोनीची स्टाईल वापरली


