PAK vs BAN : भारताविरुद्ध फायनल खेळायची स्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानची झोप उडाली, बांग्लादेशने दिली तगडी टक्कर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.तर पाकिस्तान आणि बांग्लादेश फायनल गाठण्यापासून एक पाऊल दूर आहेत.
Pakistan vs Bangladesh Super 4 : टीम इंडिया आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे.तर पाकिस्तान आणि बांग्लादेश फायनल गाठण्यापासून एक पाऊल दूर आहेत. या दरम्यान भारतासोबत फायनल खेळायची स्वप्न पाहणाऱ्या पाकिस्तानची झोप उडाली आहे.कारण बांग्लादेश संघाने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 135 धावात रोखले आहे.त्यामुळे बांग्लादेशने पाकिस्तानला तगडी टक्कर दिली आहे.
प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानला बांग्लादेशच्या गोलंदाजीनी कसून गोलंदाजी करत धावा काढण्यापासुन रोखले होते.त्यामुळे धावा काढण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचे झटपट विकेट पडले आहेत. पहिल्यांदा भारताविरूद्ध अर्धशतक झळकावणारा साहिबजादा फरहान बांग्लादेश विरूद्ध फ्लॉप ठरला,तो अवघ्या 4 धावा करून बाद झाला. त्यानंतर आशिया कपमध्ये फ्लॉप ठरलेला सॅम अयुब डकवर बाद झाला.त्यांच्यानंतर चांगल्या लयीत खेळत असलेला फखर जमानही 13 धावांवर बाद झाला होता.
advertisement
पाकिस्तानचा कर्णधार सलमान आघाने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील 19 धावांवर बाद झाला. हुसेन 3 धावावर आऊट झाला.पाकिस्तानच्या एकामागून एक विकेट पडत असताना त्यांना 100 ही धावा गाठता येत आहेत की नाही,असे वाटत होते. पण मोहम्मद हॅरीस आणि शाहिन आफ्रिदीने डाव सावरत पाकिस्तानचा डाव 100 च्या पार नेला होता. पण त्यानंतर मोहम्मद हॅरीस 31 तर शाहिन आफ्रीदी 19 धावा करून बाद झाला.यानंतर मोहम्मद नवाज मैदानात आला तो देखील 25 धावा करून बाद झाला. त्यानतर फहिमने शेवटच्या क्षणी 14 धावा केल्या आणि रौफच्या 3 धावा. या धावांच्या बळावर पाकिस्तानने 8 विकेट गमावून 135 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे बांग्लादेशसमोर 136 धावांचे आव्हान आहे.
advertisement
पाकिस्तान आणि बांग्लादेशसाठी हा खुप महत्वाचा सामना आहे. कारण हा सामना जिंकणारा संघ भारता सोबत फायनल खेळणार आहे.त्यामुळे या महत्वाच्याच सामन्यात पाकिस्तानची दांडी गुल झाल्याने सगळीकडे त्यांचं हसू होतेय. पण आता बांग्लादेश पाकिस्तानने दिलेले टार्गेट पुर्ण करून फायनल गाठते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बांग्लादेशची प्लेइंग इलेव्हन :
सैफ हसन, परवेझ हुसेन इमॉन, तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, जाकेर अली (कॅप्टन/कर्णधार), नुरुल हसन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तस्किन अहमद, तन्झिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान
advertisement
पाकिस्तानचा प्लेइंग इलेव्हन :
साहिबजादा फरहान, फखर जमान, सैम अयुब, सलमान आगा (कर्णधार), हुसैन तलत, मोहम्मद हारिस (विकेटकिपर), मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, हारिस रौफ, अबरार अहमद
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 25, 2025 10:00 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : भारताविरुद्ध फायनल खेळायची स्वप्नं पाहणाऱ्या पाकिस्तानची झोप उडाली, बांग्लादेशने दिली तगडी टक्कर