advertisement

IND vs PAK : इकडे बहिष्कार, तिकडे प्रॅक्टिस, आडमुठ्या पाकिस्तानच्या नांग्या महिला टीमच ठेचणार!

Last Updated:

येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कप 2026 ला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी पाकिस्तानने टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे, पण श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरूद्ध होणाऱ्या सामन्यात बहिष्कार टाकण्याचा निर्णय़ त्यांनी घेतला आहे.

india vs pakistan
india vs pakistan
T20 World Cup 2026, India vs Pakistan : येत्या 7 फेब्रुवारी 2026 पासून टी20 वर्ल्ड कप 2026 ला सूरूवात होणार आहे. या स्पर्धेआधी पाकिस्तानने टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे, पण श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये 15 फेब्रुवारी 2026 रोजी भारताविरूद्ध होणाऱ्या सामन्यात बहिष्कार टाकण्याचा निर्णय़ त्यांनी घेतला आहे.पाकिस्तानच्या या निर्णयाने मोठा वाद पेटला आहे. असे असतानाच पाकिस्तानच्या बहिष्काराच्या भूमिकेनंतर देखील काही खेळाडूंनी भारतासोबत सामना खेळायची तयारी दाखवली आहे.त्यामुळे पाकिस्तान धर्मसंकटात सापडली आहे.
खरं तर टी20 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 15 फेब्रुवारी 2026 ला श्रीलंकेतील कोलंबोच्या मैदानात आमने सामने येणार होते. पण या स्पर्धेला सूरूवात होण्याआधीच पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकला होता. पाकिस्तानने एक्सवर पोस्ट टाकून याची माहिती दिली होती.
दरम्यान जरी पाकिस्तानने बहिष्कार टाकला असला तरी खेळाडूंची मात्र भारतासोबत खेळायची तयारी असल्याचे दिसून येते आहे. कारण पाकिस्तानी जरी पुरूष खेळाडू भारतासोबत सामना खेळत नसले तरी महिला खेऴाडू मात्र भारतासोबत खेळायला तयार आहेत. पाकिस्तानचा महिला अ संघ बॅकॉकमध्ये होणाऱ्या रायझिंग स्टार आशिया कपमध्ये भारताच्या महिला अ संघासोबत खेळणार आहे. कारण पाकिस्तानच्या महिला संघाला या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे कोणतेही निर्देश मिळालेले नाही आहे, अशी माहिती ईसपीएनक्रिकइन्फोने सोमवारी दिली आहे.
advertisement
मिडिया रिपोर्टनूसार 13 फेब्रुवारी 2026 पासून सूरू होणाऱ्या रायझिंग स्टार आशिया कपची तयारी वेळापत्रकानुसार सूरू आहे. पाकिस्तानी महिला अ संघ 15 फेब्रुवारी 2026 ला खेळणार आहेत.त्याच दिवशी भारताच्या पाकिस्तानच्या पुरुष संघामध्ये सामना पार पडणार होता. पण या पाकिस्तानने वर्ल्डकपमधील हा सामना खेळणार नसल्याची भूमिका घेत बहिष्कार टाकला होता.
विशेष म्हणजे पाकिस्तान बोर्डाने बहिष्काराची सोशल मीडियावर घोषणा केल्याच्या काही तासांतच पीसीबीने रविवारी एक प्रेस रिलीज जारी करून स्पर्धेसाठी महिला अ संघाची घोषणा केली. पाकिस्तान महिला अ संघाला भारत अ, युएई आणि नेपाळ यांच्यासह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे, जे अधोरेखित करते की, किमान सध्या तरी, महिलांच्या सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
advertisement
ईसपीएन क्रिकईन्फओच्या वृत्तानुसार पीसीबी विरुद्धच्या संभाव्य निर्बंधांबद्दल अटकळ बांधली जात असताना, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अद्याप या विषयावर चर्चा करण्यासाठी बोर्ड बैठक आवश्यक आहे की नाही हे ठरवलेले नाही.अशा कोणत्याही विचारविनिमयात 12 पूर्ण सदस्य मंडळे, तीन असोसिएट प्रतिनिधी आणि ICC अध्यक्ष यांचा समावेश असेल, परंतु आतापर्यंत कोणतीही आपत्कालीन बैठक बोलावण्यात आलेली नाही.
advertisement
ICC ने आधीच आपली भूमिका स्पष्ट केली आहे, असा इशारा देत की "निवडक सहभाग" हा प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि सातत्य यावर आधारित जागतिक स्पर्धांच्या मूलभूत तत्त्वाशी जुळवून घेणे कठीण आहे. पुरुषांच्या भारत-पाकिस्तान सामन्याची अनिश्चितता असताना, महिला संघासाठी बहिष्काराचे कोणतेही निर्देश नसणे या दोन्ही परिस्थितींमधील तीव्र फरक दर्शवते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs PAK : इकडे बहिष्कार, तिकडे प्रॅक्टिस, आडमुठ्या पाकिस्तानच्या नांग्या महिला टीमच ठेचणार!
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement