INDA vs PAKA: आशिया कपमध्ये उलथापालथ, टीम इंडियासाठी Do-Or-Die मॅच; भारतासाठी सेमीफायनलचे समीकरण पलटले
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
INDA vs PAKA: एसीसी मेन्स रायझिंग स्टार आशिया कप 2025 मध्ये पाकिस्तानच्या युवा संघाने भारतीय स्टार्सला धक्का देत ग्रुप बी मध्ये सलग दुसरा विजय मिळवला आणि थेट सेमीफायनलमध्ये मजल मारली. भारत मात्र आता ‘डू ऑर डाय’ स्थितीत असून ओमानविरुद्धची अखेरची लढत जिंकणे अत्यावश्यक ठरणार आहे.
दोहा: एसीसी मेन्स रायझिंग स्टार आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तानच्या युवा संघाने आयपीएल स्टार्सचा भरणा असलेल्या भारतीय संघाचा पराभव केला. स्पर्धेतील ग्रुप फेरीतील पाकिस्तानचा हा सलग दुसरा विजय असल्याने ते पुढच्या फेरीत दाखल झाले आहेत. या उटल भारताने 2 पैकी एकामध्ये विजय मिळवला आहे. गुणतक्त्यात टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावर आहे. आणि भारताची अखेरची लढत ओमान विरुद्ध होणार आहे.
advertisement
स्पर्धेसाठी दोन ग्रुप असून प्रत्येक ग्रुपमध्ये चार संघ आहेत. दोन्ही ग्रुपमधून अव्वल दोन संघ सेमीफायनलमध्ये पोहोचतील. त्यामुळे आता भारताला अखेरच्या साखळी सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागले. कारण ओमान संघाची अवस्था भारतासारखी आहे. त्यांनी 2 पैकी एका लढतीत विजय तर एक लढत गमावली आहे.
advertisement
भारतावरील विजयानंतर पाकिस्तानचा संघ ग्रुप बी मध्ये 4 गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला. इतक नाही तर ते सेमीफायलमध्ये पोहोचले आहेत. भारत 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारताचे नेट रनरेट 2.245 इतके आहे.
भारत आणि ओमान यांच्यातील लढत 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या लढतीत विजय मिळवणारा संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.
advertisement
भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तान संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने दमदार सुरूवात केली होती. मात्र वैभव सूर्यवंशीची विकेट १०व्या ओव्हरमध्ये गेली त्यानंतर भारताचा डाव गडगडला, 9.4 ओव्हरमध्ये 3 बाद 91 धावा करणाऱ्या टीम इंडियाचा डाव फक्त 137 धावात संपुष्ठात आला.
advertisement
भारताचा डाव 19व्या ओव्हरमध्ये 136 वर संपुष्ठात आला. टीम इंडियाने जबरदस्त सुरुवात करून दिली होती. 9.4 ओव्हरमध्ये 91 धावा करणाऱ्या भारताच्या फलंदाजांनी नंतर फक्त मैदानावर हजेरी लावण्याचे काम केले. भारताने फक्त 45 धावात 7 विकेट गमावल्या. भारताकडून सर्वाधिक धावा वैभव सूर्यवंशीने केल्या. त्याने 28 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 45 धावा केल्या. या शिवाय नमन धीरने 20 चेंडूत 35 धावांचे योगदान दिले.
advertisement
पाकिस्तानने विजयाचे लक्ष्य फक्त 13.2 ओव्हरमध्ये 2 विकेटच्या बदल्यात पार केले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2025 11:31 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
INDA vs PAKA: आशिया कपमध्ये उलथापालथ, टीम इंडियासाठी Do-Or-Die मॅच; भारतासाठी सेमीफायनलचे समीकरण पलटले


