17 तासांमध्ये दुसरा पराभव, पाकिस्तान परत तोंडावर आपटलं, टीम इंडियाने पुन्हा 'औकात' दाखवून दिली!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
पाकिस्तानला भारतासमोर सगळीकडेच पराभवाचा सामना करावा लागत आहे. आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमने लागोपाठ दोनदा पाकिस्तानला धूळ चारली.
मुंबई : पाकिस्तानला भारतासमोर सगळीकडेच पराभवाचा सामना करावा लागत आहे. आशिया कपमध्ये भारतीय क्रिकेट टीमने लागोपाठ दोनदा पाकिस्तानला धूळ चारली, यानंतरही पाकिस्तानला भारताकडून मानहानी पत्करावी लागली आहे. क्रिकेटनंतर भारताने फुटबॉलच्या मैदानातही पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे झालेल्या दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन अंडर-17 चॅम्पियनशिपमध्ये भारताने पाकिस्तानचा 3-2 ने पराभव केला. याचसोबत भारताने आपल्या ग्रुपमध्ये पहिले स्थान मिळवले.
कोलंबोपासून हजारो मैल दूर दुबईमध्ये रविवार 21 सप्टेंबर रोजी रात्री 12 वाजता, भारतीय क्रिकेट टीमने आशिया कप 2025 च्या सुपर फोर सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. या विजयानंतर अवघ्या 17 तासांत, सोमवार, 22 सप्टेंबर रोजी, भारताच्या युवा फुटबॉल स्टार्सनी पाकिस्तानला धक्का दिला. आशिया कपप्रमाणेच SAFF चॅम्पियनशिपमध्ये भारत आणि पाकिस्तान एकाच गटात होते आणि त्यांच्यातल्या ग्रुप स्टेजमधील सामन्याचा निकाल क्रिकेटसारखाच होता.
advertisement
ग्रुप बी च्या या सामन्यात, भारतीय टीमने पाकिस्तानचा 3-2 असा पराभव केला आणि तिन्ही सामने जिंकून त्यांच्या गटात पहिले स्थान मिळवले. टीम इंडियाने सामन्यात गोलची सुरुवात केली, 31 व्या मिनिटाला डल्लामुओ गंगटेने गोल करून त्यांना 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण, 43 व्या मिनिटाला मुहम्मद अब्दुल्लाहने पेनल्टीवर गोल करून पाकिस्तानला बरोबरी करून दिली. दुसऱ्या हाफमध्ये टीम इंडियाने पुन्हा आघाडी घेतली, 63 व्या मिनिटाला गुनलिबा वांगखेरकपमने गोल करून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.
advertisement
पण पाकिस्तानने परत झुंज दिली, 70 व्या मिनिटाला हमजा यासिरने त्यांचा दुसरा गोल केला. पाकिस्तानची ही बरोबरी जास्त काळ टिकली नाही आणि अवघ्या तीन मिनिटांनी, भारताने सामन्यात तिसऱ्यांदा आघाडी घेतली. यावेळी, रेहान अहमदने 73 व्या मिनिटाला गोल करून 3-2 अशी आघाडी घेतली. यानंतर, भारतीय टीमने पाकिस्तानला बरोबरीची एकही संधी दिली नाही. अशा प्रकारे, टीम इंडियाने त्यांच्या गटातील तिन्ही सामने जिंकले.
advertisement
टीम इंडिया सेमीफायनलमध्ये
भारतीय टीम आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचली होती, तर पाकिस्तानने या पराभवानंतरही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. आता सेमीफायनलमध्ये भारतीय टीमचा सामना नेपाळशी होईल, तर पाकिस्तानचा सामना बांगलादेशविरुद्ध होईल. भारतीय टीमने ही स्पर्धा सर्वाधिक सहा वेळा, तर पाकिस्तानने फक्त एकदाच जिंकली आहे. टीम इंडिया गेल्या वर्षीची विजेता होती आणि आता सातव्यांदा विजेतेपद जिंकण्याच्या जवळ आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 22, 2025 10:56 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
17 तासांमध्ये दुसरा पराभव, पाकिस्तान परत तोंडावर आपटलं, टीम इंडियाने पुन्हा 'औकात' दाखवून दिली!