Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिंपिकमध्ये मध्य रेल्वेचे 2 कर्मचारी सहभागी; या क्रिडा प्रकारात दाखवणार कौशल्य

Last Updated:

Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत मध्य रेल्वेचे दोन खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. पुणे आणि मुंबई मंडळात हे दोघेजण कर्मचारी आहेत.

News18
News18
मुंबई : सध्या संपूर्ण जगभरात पॅरिस ऑलिंपिकच्या चर्चा आहेत. कुठला देश किती मेडल मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र देखील मागे नाही. महाराष्ट्रातून एकूण 5 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून, मध्य रेल्वेचे 2 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे आणि मुंबई मंडळात असलेले हे 2 कर्मचारी पॅरिस ऑलम्पिकमध्ये सहभागी झाले आहेत. स्वप्नील कुसळे आणि अंकिता ध्यानी अशी खेळाडूंची नावे आहेत. हे दोघेही पुणे आणि मुंबई विभागात कमर्शियल कम तिकीट क्लर्क म्हणून कार्यरत आहेत.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या दोन खेळाडूंमधील स्वप्नील कुसळे हे महाराष्ट्रातील क्रीडा नेमबाज असून मध्य रेल्वेच्या पुणे मंडळात कार्यरत आहेत. स्वप्निल यांची 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. यापूर्वी 2022 मध्ये, त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी इजिप्तमधील कैरो येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या स्थानासह पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3-पोझिशन स्पर्धेत ऑलिम्पिक कोटा बर्थ जिंकला होता. 2023 मध्ये चीनमधील आशियाई क्रीडा स्पर्धा, 2022 मध्ये बाकू येथील विश्वचषक आणि 2021 मध्ये नवी दिल्ली येथे नेमबाजीत स्वप्निल यांनी सुवर्णपदके जिंकली आहेत. याशिवाय त्यांनी 2015 ते 2023 या कालावधीत विविध नेमबाजी स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील नेमबाजी स्पर्धेत स्वप्निल भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
advertisement
मध्य रेल्वेच्या दुसऱ्या खेळाडू अंकिता ध्यानी या मोर्चा उत्तराखंड येथील रहिवासी असून त्या मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये सध्या कार्यरत आहेत. अंकिता या एक धावपटू असून, त्या मध्यम आणि लांब अंतराच्या क्रीडा प्रकारातील स्पर्धक आहेत. अंकिता या महिलांच्या 5000 मीटर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. अंकिता यांनी आत्तापर्यंत 26व्या राष्ट्रीय फेडरेशन कप वरिष्ठ ऍथलेटिक्स, 17व्या, 18व्या आणि 19व्या फेडरेशन कप ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आणि 33व्या, 34व्या, 35व्या आणि 36व्या राष्ट्रीय ज्युनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके जिंकली असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या दोन्ही खेळाडूंना कायरीस ऑलम्पिक मध्ये सहभागी झाल्याबद्दल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करन यादव यांनी शुभेच्छा दिल्या असून, मध्य रेल्वे आणि भारतीय रेल्वेसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे यादव यांनी म्हटले आहे. "आपले खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेचा भाग आहेत. ऑलम्पिक खेळांसाठी मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असते. अत्यंत कठोर परिश्रम, जिद्द आणि जीवनात शिस्त लागते. मध्य रेल्वेचे हे दोनही कर्मचारी अत्यंत मेहनती असून या स्पर्धेसाठी त्यांना मध्य रेल्वे परिवाराकडून शुभेच्छा" देत असल्याचे महाव्यवस्थापक यादव यांनी म्हटले आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिंपिकमध्ये मध्य रेल्वेचे 2 कर्मचारी सहभागी; या क्रिडा प्रकारात दाखवणार कौशल्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement